Pradosh Vrat : गुरू प्रदोष व्रताला हर्षण योग तर चंद्र मीन राशीत, 5 राशींना बंपर लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

5 Luckiest Zodiac Sign, 26 October 2023 Pradosh Vrat : पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत गुरुवारी 26 ऑक्टोबरला आहे. यादिवशी ध्रुव, हर्षण योगासह पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या शुभ योग जुळून आला आहे. त्याशिवाय चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या शुभ योगामुळे पाच राशींची बंपर लॉटरी लागणार आहे.  (Harshan yoga for Guru Pradosh Vrat and moon transit in pisces thursday 26 october bumper benefits for 5 signs)

मेष (Aries Zodiac)

 मेष राशीच्या लोकांसाठी गुरु प्रदोष व्रत आणि चंद्र गोचर अतिशय शुभ ठरणार आहे.  सरकारी संबंधित कामं मार्गी लागणार आहे. नोकरदार लोक त्यांच्या अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळणार आहे. तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.  त्यातून तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार असून तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा दिवस लाभदायक असणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)  

गुरु प्रदोष व्रत आणि चंद्र गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. कर्क राशीच्या लोकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे.  अचानक पैसे मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. कौटुंबिक सदस्यांशी संबंध दृढ होणार आहे. पैशाशी संबंधित कामासाठी अतिशय चांगला असणार आहे. गुंतवणूक करायाचा विचार करत असाल तर हा दिवस उत्तम आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

प्रदोष व्रत आणि चंद्र गोचर हे सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे.  नवीन प्रकल्पांवर तुम्ही काम करणार आहात. तुमचं काम सोडून इतरांना मदत करणार आहात. अध्यात्मिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित कराल. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न असणार आहे. तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल त्यात तुमची प्रगती होणार आहे. जमीन खरेदीची योगही जुळून आला आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

चंद्र गोचर आणि प्रदोष व्रत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण असेल. नोकरदार लोक सहकाऱ्यांच्या मदतीने नवीन प्रकल्पावर काम करणार आहात. घरात मुलांसोबत तुमचा वेळ आनंदी जाणार आहे. तुम्ही हातात घेतलं काम सहज पूर्ण होणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)

चंद्र गोचर आणि प्रदोष व्रत मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. विरोधकांवर विजय मिळवणार आहात. तुमच्यावरील कर्जाचे बोझ उतरणार आहे. कौटुंबिक सुखसोयीत वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिक स्पर्धा असली तरी तुम्ही सहज त्यातून निभवून नेणार आहात. तुमचे अनेक काम मार्गी लागणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts