Suicide For Maratha Reservation Protestors Reached The Tehsil Office With Dead Bodie In Latur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लातूर : “मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसीलसमोर आणण्यात आला आहे. तसेच, ढोपरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलेल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. शिरूर अनंतपाळ तहसीलसमोर मृतदेह घेऊन आंदोलक एकवटले असून, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी शिरूर अनंतपाळ तहसील समोर उपोषण सुरू आहे. याच ठिकाणी व्यंकट ढोपरे यांचा मृतदेह आणण्यात आला आहे. व्यंकट ढोपरे यांच्या आत्महत्येच्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या बाबींची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाहीत अशी भूमिका आता आंदोलकानी घेतली आहे. आळंदीवरून मृतदेह ज्या रुग्णवाहिकेत आणण्यात आले आहेत, ती रुग्णवाहिका थांबून ठेवण्यात आली आहे.

शहर बंदची हाक…

माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांच्या आत्महत्यानंतर शिरूर अनंतपाळ तालुक्यात शोकाकुल वातावरण आहे. आज शिरूर अनंतपाळ शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक लोक शिरांतपाळ तहसीलसमोर एकत्र आले आहेत. माजी सरपंच यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका आणि तालुक्यातून एकत्र आलेले आंदोलक हे सर्व तहसीलसमोर गोळा झाले आहेत. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

ढोपरे यांनी काय लिहिले होते पत्रात…

“मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूप वेळा सरपंच या नात्याने मी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जातीधर्माच्या समाजाला घेऊन बऱ्याचवेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला, पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही. माझ्या मुलाचा कृषी खात्यात 2012 ला अनुकंपातत्त्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीसुद्धा आजी-आजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राद्वारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून, त्याची पूर्ण फाइल माझ्या गावी घरी कपाटात आहे. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावलले गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आज रोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे. मी सरपंच या नात्याने 2021 ला 65 वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे 50 ते 60 लोकांचे पेपर देऊनदेखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे.”

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : सरपंच असल्यापासून मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान, पण आता… पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी घेत स्वतःला संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?

[ad_2]

Related posts