( प्रगत भारत । pragatbharat.com)
Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे.
एक महिला आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिच महिला काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या पतीसोबत करवा चौथची खरेदी करत होती. तिने पतीकडून करवा चौथची चांगली खरेदी करुन घेतली. मनासारख्या वस्तू घेतल्या. तिचे हवे नको ते सर्व लाड पतीने पुरवले. पण आता साऱ्या वस्तू घेऊन ती फरार झाली आहे.
पीडित पतीला अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाही. आता त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. माझ्या बायकोला भावोजीने फूस लावून पळवून नेले आहे अशी तक्रार त्याने दिली आहे. तो माझ्या पत्नीकडून काही चुकीची कामे करवून घेऊन शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली.
मेरठमधील जानी पोलीस स्टेशन परिसरातील सिसौला गावात हा प्रकार घडला. याच गावातील रहिवाशी रामफल यांचा मुलगा अशोक कुमार याचे 2019 साली लग्न झाले होते. रामफलची पत्नी प्रिया ही गंगानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आम्हेडा आदिपूर गावची रहिवासी आहे. दोघांनाहीदीड वर्षांचा मुलगा आहे. अशोकचा भावोजी राहुल अनेकदा त्यांच्या घरी येत जात असे. माझ्या अनुपस्थितीतही राहुल अनेकदा घरी आला होता, असे अशोकने पोलिसांना सांगितले.
पती कामावर गेल्याचे पाहून पत्नी फरार
राहुलने पत्नीला फूस लावून आपल्या ताब्यात घेतल्याचे अशोकने तक्रारीत म्हटले आहे. असे काहीतरी होऊ शकते अशी शंका अशोकला होती. त्याने आपल्या पत्नीलाही अनेक वेळा समजावून सांगितले. तसेच राहुलला घरी येण्यापासून रोखले. 27 ऑक्टोबर रोजी अशोक कामावर गेला होता, त्याच दरम्यान राहुल आला आणि प्रिया आणि तिच्या मुलाला आपल्यासोबत घेऊन गेला. प्रियाने 15 हजार रुपये आणि दागिनेही सोबत घेतल्याचे अशोक सांगतो.
एक दिवस आधीपर्यंत पत्नी करवा चौथची खरेदी करत होती. गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी दोघेही एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत करणार होतो, असे त्याने सांगितले. राहुल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे आणि तो मला गैरकृत्यांमधून अडचणीत आणेल, असे अशोकने तक्रारीत म्हटले आहे.