दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Rate Today In Marathi: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीनंतर लग्नसराईची लगबगही सुरू होते. त्यावेळी अनेक जण दिवाळीतील शुभमुहूर्तावरच दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार असतानाच आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. 

देशातर्गंत वायदे बाजारात सोन्या चांदीच्या किमती दिवसभरातील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. अमेरिकन सेंट्रल बँक जेरोम पॉवेल व्याजदरांबाबत निर्णय घेणार असल्याने गुंतवणुकदार सावध पावलं उचलत आहेत. त्यामुळंच सराफा बाजारात दबाव पाहायला मिळत आहेत. कोमोडिटी बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जगभरातील घडामोडींचा परिणाम देशातर्गंत वायदा बाजारात दिसून येत आहे. 

कोमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा दर 200 रुपयांपेक्षा अधिक घसरला असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,530 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर चांदीचा दरही 500 रुपयांनी 71582 रुपये किलोवर पोहोचला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 170 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम सोन्याची विक्री 61,470 रुपयांना होत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 56,350 रुपयांवर आला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळं बाजारात सोन्याची किंमत सुमारे अर्धा टक्क्यांच्या घसरणीसह 1980 डॉलरच्या खाली घसरली आहे. सोन्याच्या दरात आज 10 डॉलरची घसरण झाली आहे. चांदीमध्ये यापेक्षा जास्त घसरण आहे. कॉमेक्सवर, चांदी 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति ऑन 23 डॉलरच्या खाली गेली आहे.

सोनं खरेदीचा मुहूर्त

धनतेसरच्या मुहूर्तावर आवर्जुन सोनं खरेदी केले जाते. यंदा 10 नोव्हेंबर रोजी धनतेरस साजरी केली जाणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.35 पासून ते 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.57 पर्यंत सोनं खरेदीचा मुहूर्त आहे. धनतेरस पुजा मुहूर्ताबाबत बोलायचं झाल्यास, संध्याकाळी  5.07 मिनिटांपासून ते 7.43 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. 

धनत्रयोदशीला काय खरेदी केले जाते सोनं?

हिंदू मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला धन व संपत्तीची देवी मानलं जातं. धनत्रयोदशीला धनसंपत्ती, उत्पन्नाच्या संधी, व्यावसायात गती आणि यश वाढवण्यासाठी भगवान धन्वंतरी घरी येतात, अशी एक मान्यता आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातू शुभ मानले जातात.

Related posts