Angelo Mathews Timed Out Controversy In Sri Lanka Vs Bangladesh Match In World Cup 2023 Shakib Al Hasan Sourav Ganguly Time Out Story Know All Updates



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Angelo Mathews Timed Out Sourav Ganguly: आयसीसी विश्वचषक (ICC World Cup 2023) स्पर्धा आता सेमीफायनल्सच्या जवळ आली आहे. टीम इंडियानं (Team India) स्पर्धेत आतापर्यंत आठ सामने खेळले असून आठही सामने जिंकले आहेत. स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतशी आणखी रोमांचक होताना दिसत आहे. रोमांचक होण्यासोबतच स्पर्धेतील अनेक वाद समोर आले आहेत. सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका (Sri Lanka) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एक मोठा वाद समोर आला. हे प्रकरण देशासह संपूर्ण जगभरात वादाचा मुद्दा बनला आहे. 

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात टाईम आऊट होण्याचा वाद सध्या जोरदार चर्चेत आहे. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पण तुम्हाला माहितीय का? मॅथ्यूजच्या आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील एकदा टाईमआऊटच्या विळख्यातून थोडक्यात निसटला होता. 

World cup 2023 : 16 वर्षांपूर्वी असं काय घडलं होतं की, दादा टाईमआऊट होता होता वाचलेला 

तब्बल 16 वर्षांपूर्वीची घटना. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. केपटाऊनमध्ये कसोटी सामना सुरू होता. याच सामन्यातून ‘दादा’ टाईमआऊट होण्यापासून थोडक्यात वाचला होता. जर या सामन्यात गांगुली टाईमआऊट झाला असता, तर कालच्या सामन्यात टाईमआऊट झालेला अँजेलो मॅथ्यूज टाईमआऊट झालेला दुसरा खेळाडू ठरला असता. पण त्यावेळी दादा म्हणून प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली टाईमआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला होता. आता तुमच्या मनात एकाच प्रश्नानं काहूर माजलं असेल की, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? काय झालेलं की, सौरव गांगुली टाईमआऊट होणार होता. आणि त्यातून गांगुलीची सुटका नेमकी झाली कशी? 

2007 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन कसोटी सामना खेळला जात होता. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स अवघ्या 6 धावांत गमावल्या. वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर एकापाठोपाठ एक बाद झाले होते.

World cup 2023 : गांगुलीला मैदानावर उतरण्यास 6 मिनिटांचा उशीर

यानंतर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी मैदानात येणार होता, मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो काही काळ मैदानाबाहेर राहिला. त्यामुळे तो निर्धारित वेळेपूर्वी फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण आंघोळीसाठी गेला होता. त्यादरम्यान सौरव गांगुली ट्रॅकसूटमध्ये फिरत होता. त्याला लगेच तयार होऊन मैदानात यावं लागणार होतं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मग टीम स्टाफ गांगुलीला तयारी करण्यासाठी मदत करु लागले. ड्रेसिंग रुममध्ये एकच गोंधळ उडाला. 

कुणी गांगुलीला पॅड घालतंय, तर कुणी जर्सी घालतंय. एवढं सगळं करूनही गांगुलीला मैदानात येण्यास 6 मिनिटं उशीर झाला. क्रिकेटच्या नियमानुसार कोणत्याही फलंदाजाला मैदानात जाऊन पुढचा चेंडू 3 मिनिटांत खेळायचा असतो. मात्र, त्यावेळी सौरव गांगुलीला एक, दोन नाही, तब्बल 6 मिनिटं उशीर झाला. गांगुली मैदानात आला तेव्हा पंचांनी सर्व नियम आणि प्रकरण दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला समजावून सांगितलं होतं. मात्र, स्मिथनं टाईमआऊटचं कोणतंही अपील केलेलं नाही. स्मिथनं खिलाडूवृत्ती दाखवत गांगुलीला टाईमआऊट होऊ दिलं नाही. आणि टीम इंडियाचा दादा एका टाईमआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. 

World cup 2023 : हेल्मेट ठरलं कारण, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज ठरला टाईमआऊट 

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट झालेला पहिला फलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात तो एकही चेंडू न खेळता बाद झाला. आयसीसीच्या नियमानुसार, नव्या फलंदाजानं दोन मिनिटांच्या निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी सज्ज होणं अपेक्षित आहे. पण फलंदाजीचा पवित्रा घेण्याआधी मॅथ्यूजला आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचं लक्षात आलं. त्यामुळं त्यानं राखीव खेळाडूकडून दुसरं हेल्मेट मागवलं. त्यात काही वेळ गेल्यानं बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि इतर क्षेत्ररक्षकांनी मॅथ्यूजविरोधात टाईमआऊटचं अपील केलं. मैदानावरच्या पंचांनी तो निर्णय तिसरे पंच नितीन मेनन यांच्यावर सोपवला. त्यांनी डीआरएसचा वापर करून मॅथ्यूजविरोधातलं टाईमआऊटचं अपील उचलून धरलं. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजनं मैदानावरील पंचांशी काही काळ वाद घातला. पण बांगलादेशचा कर्णधार आपल्या अपिलावर ठाम राहिला. त्यामुळं तिसऱ्या पंचांचा निर्णय स्वीकारून अँजेलो मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

Related posts