पप्पांची किडनी खराब आहे म्हणत गरीब BF कडून उकळले 20 लाख! सत्य कळताच त्यानं…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bihar Crime News : प्रेमासाठी लोक काही करायला तयार होतात. मात्र, प्रेमात धोका मिळाला तर आयुष्य उद्धवस्त होते. असचं काहीस बिहारमधील एका तरुणासह घडले आहे. गर्लफ्रेंडने वडिलांची किडनी खराब झाल्याचे सांगत त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळले. प्रेयसीने केलेल्या या आर्थिक फसवणुकीमुळे या तरुणाने आणि त्याच्या आईने शेवटी आत्महत्या केली. 

स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा आत्महत्या करणाऱ्या आई आणि मुलाची नावे आहेत. मृत महिलेचे पती हे बिहार मधील नामांकित पत्रकार आहेत. आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान यांच्या आत्महत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. ज्यामुळे आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या संपूर्ण प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

हे संपूर्ण प्रकरण बिहारमधील पूर्णिया येथील आहे.  स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा या दोघांनी आत्महत्या केली. सुरुवातील कौटुंबिक वादातून दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तपासादरम्यान या मायलेकाने कौटुंबिक कलहामुळे नाही तर विश्वासघात प्रेमसंबाधातून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

मोबाईलमुळे झाला खुलासा

पारिजात याचे प्रिया नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रिया वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगत पारिजातकडून पैसे उकळत होती. वडिलांची किडनी फेल झाली असल्याचे प्रियाने पारिजातला सांगितले. वडिलांच्या उपचारासाठी पैसे मागत प्रियाने परिजात याला जवळपास 20 लाखांचा गंडा घतला. प्रियावर असलेल्या प्रेमामुळे परिजात याने तिच्या वडिलांवर उपचार करण्यासाठी  लोकांकडून 20 लाखांचे कर्ज घेतले होते. 

कर्जात बुडाला आणि आयुष्य संपवले

गर्लफ्रेंडच्या वडिलावंर उपचार करण्यासाठी परिजातने 20 लाखांचे कर्ज घेतले. लाखो रुपये त्याने प्रियाच्या आकाऊंटवर ट्रान्सफर केले होते.   यामुळे तो कर्जात बुडाला. परिजात याने आई आणि भावाच्या नावावर सावकार तसेच अनेकांकडून कर्ज  घेतले होते. सावकाराने परिजात तसेच त्याच्या आईकडे पैशांचा तगादा लावला होता. पैसे वसुल करण्यासाठी सावकार त्यांच्या घरी येवून गोंधळ घालत होते. यामुळे त्यांची मोठी बदनामी होती. कर्ज फेडणे शक्य नसल्याने नैराश्यामुळे परिजात आणि त्याच्या आईने आत्महत्या केली. 

मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीमुळे झाला खुलासा

स्निग्धा मित्रा आणि परिजात मित्रा यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी मृतदेहाजवळ पोलिसांना दोन सुसाईड नोट सापडल्या आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये नमूद केले  आहे. पोलिसांनी परिजात याचा मोबाईल तपासला असता प्रिया नावाचे अनेक फोन कॉल्स आणि मिस कॉल दिसले. यानंतर तपासादरम्यान प्रियाचे सत्य पोलिसांसमोर उघड झाले.  

 

Related posts