Video : भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत तयार झालं नविन बेट; व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

New Island : समुद्राच्या मध्यभागी असलेली एकाकी बेट सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र, या बेटांची निर्मी कशी होते हे कुणीच प्रत्यक्षात पाहिलेला नाही. भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत  नविन बेट  तयार झालं आहे. जपानमधील समुद्रात बेट निर्माण होत असतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अचंबित होत आहेत. 

लहान मोठी अशी शेकडो बेट या पृथ्वीवर आहेत. काही बेट ही अतिशय सुंदर असून लोक येथे पर्यटनासाठी येतात. तर, काही बेट अतिशय धोकादायक असून फिरण्यासाठी असुरक्षित देखील आहेत. बेटांची निर्मीती वेगवेगळ्या भौगोलिक आणि नैसर्गिक प्रक्रियांमुळे होते. बेट निर्माण होताना शक्यतो कुणीही पाहिले नसेल. मात्र, बेटाची निर्मीती होतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे सर्वांना बेटाची निर्मीती कशा प्रकारे होते हे पहायला मिळत आहे. 

समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक

जपानजवळ एक नवीन बेट तयार झाले आहे. जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस १००० किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भर  समुद्रात अवघ्या काही मिनिटांत नविन बेट निर्माण झाले आहे. या बेटाचा आकार किमान 200 मीटर लांब आहे.  

व्हिडिओ व्हायरल

इवोटो बेटाच्या किनाऱ्यापासून थोड्या दूर अंतरावरच हे नविन बेट तयार झाले आहे. पूर्वी इवोटोला इवोजिमा नावाने ओळखले जायचे. इवोटोवर सध्या जपानी नौदलाचा एअरबेस आहे. ज्याचा दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. इवोटो येथील नौदलाच्या एअरबेसमुळे या नविन बेटाची माहिती मिळू शकली. 4 नोव्हेंबर रोजी  भर  समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट झाला. याची भीषणता पाहता हा शक्तीशाली बॉम्बस्फोट असल्याचे वाटले. प्रत्यक्षात मात्र, हा ज्वालामुखीचा स्फोट होता. 21 ऑक्टोबरपासून येथे सतत भूकंपाचे धक्के जाणवत होते. यानंतर येथे ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला.  ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणात दगड, माती तसेच लावा बाहेर. यातूनच या नविन बेटाची निर्मिती झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये हे बेट कशा प्रकारे निर्माण झाले हे दिसत आहे.    

7000 नवीन बेटांची निर्मीती

35 वर्षात जपानच्या समुद्र किनाऱ्याजवळ 7000 नवीन बेटांची निर्मीती झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. यापैकी अनेक बेट समुद्रात लुप्त देखील झाली आहेत. 
 

Related posts