Deputy CM Devendra Fadnavis On Visit To Sambhajinagar Today Will Manoj Meet Manoj Jarange Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadnavis to Chhatrapati Sambhajinagar Visit : छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जरांगे यांची फडणवीस आज भेट घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे फडणवीस यांचा आजचा संभाजीनगरचा दौरा महत्वाचा समजला जात आहे.

जरांगे यांचे उपोषण सुरू असताना आंतरवाली सराटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भेट दिली होती. परंतु, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या उपोषणास्थळी फडणवीस एकदाही गेले नाही. याचवेळी जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर थेट टीकाही केली होती. यावरून भाजप नेत्यांनी देखील जरांगे यांना प्रतिउत्तर दिले होते. आता ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहे, त्याच संभाजीनगरमध्ये आज फडणवीस येणार आहे. त्यामुळे आज तरी जरांगे आणि फडणवीस यांची भेट होईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला येणार फडणवीस 

छत्रपती संभाजीनगरच्या आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम यांचे तीन दिवसीय कार्यक्रम होत आहे. आज बागेश्वर बाबांच्या दरबाराचा समारोप होणार आहे. त्यामुळे, याच कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस येत आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. सोबतच यावेळी फडणवीस यांचे भाषण देखील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असल्याची भाजपकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रात मोठी जाहिरात देखील देण्यात आली आहे.

भुजबळांनी जरांगेची भेट टाळली? 

दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ देखील छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती, त्याचप्रमाणे त्यांनी भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे संभाजीनगर शहरात येऊन देखील भुजबळ यांनी जरांगे यांची भेट घेण्यास टाळले होते. तसेच, आपण जरांगे यांची भेट घेणार नाही, पण त्यांना शुभेच्छा असं भुजबळ म्हणाले होते.

[ad_2]

Related posts