( प्रगत भारत । pragatbharat.com)
Dhanteras Horoscope 10 November 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला नेमका कोणता लाभ होणार, आजचा दिवस नेमका कसा असणार? पाहा राशीभविष्य…
मेष (Aries)
आरोग्याची काळजी घ्या. आज जुनी आजारपणं दूर जाणार आहेत. लहान मुलं किमया करणार आहेत. आज कुटुंबीयांची भेट घडेल.
वृषभ (Taurus)
भावनांच्या भरात येऊन निर्णय घेण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करा. वाणीवर ताबा ठेवा.
मिथुन (Gemini)
आज एखादं यज्ज्ञ करा. संतानसुख मिळणार आहे. आज मोठ्यांचे आशीर्वाद फळणार आहेत.
कर्क (Cancer)
व्यापारात प्रगतीची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी वातावरण उत्साहाचं असेल.
कर्क (Cancer)
आरोग्य सुधारेल. तुमच्यावर वरिष्ठांचा वरदहस्त असेल. आज एखाद्या अशा व्यक्तीला भेटाल जी तुमच्या भाग्योदयास कारणीभूत असेल.
सिंह (Leo)
आज तब्येत जपा. एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखाल. घरात एखाद्या शुभकार्याचा योग आहे.
कन्या (Virgo)
प्रेमाच्या नात्यात एक सुरेख दिवस येणार आहे. आज अविवाहितांसाठी लग्नाचं स्थळ येणार आहे. आप्तेष्ठांची भेट घडेल.
तूळ (Libra)
खर्च सांभाळूनच करा. धनलाभाची संधी आहे पण लक्ष्मी सांभाळून ठेवा. काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio)
आर्थिक प्रकरणी असणारा तिढा सुटणार आहे. कायदेशीर कामं पूर्ण होणार आहेत. जमिनीचे व्यवहार कराल.
धनु (Sagittarius)
नव्या घराच्या खरेदीचा विचार कराल. मोठे व्यवहार कराल. परदेशवारीची संधी चालून येणार आहे. लक्ष असूद्या.
मकर (Capricorn)
आज नशीब तुम्हाला साध देणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. अडचणी दूर होणार आहेत.
कुंभ (Aquarius)
व्यापारामध्ये लाभ आहे. एखादी नवी वस्तू खरेदी कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
मीन (Pisces)
एखाद्या आरामाच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखाल. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत कराल. दिवस आनंदाचा आहे.
( Disclaimer – वरील माहिती ज्योतिषशास्त्रातील संदर्भांवर आधारेलली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)