विद्यार्थ्यांनो, गुणांच्या मागे धावू नका, उद्योग, व्यवसायाचे शिक्षण घेऊन पुढे जा – डॉ. गणेश शिंदे

( प्रगत भारत । pragatbharat.com)

”समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो यासाठी आपले ज्ञान समाजासाठी वापरले पाहिजे. समाजाकरिता कार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता डोळे विस्पारून जगाकडे पाहावे. व्यवसायात, व्यापारात भाग घ्यावा. भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण, दुर्दैवाने आपल्याला हे समजलेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्योग, व्यवसायाचे शिक्षण घेऊन पुढे जावे. यशस्वी होण्याचा हाच तर मार्ग आहे”, असा मूलमंत्र प्रसिद्ध व्याख्याते डॉ. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

संदीप वाघेरे युवा मंचातर्फे प्रभाग क्रमांक 21 मधील इयत्ता 10 व 12 वी मध्ये उल्लेखनीय गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम तसेच प्रभागातील इयत्ता 1 ली ते 8 वी मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. पोलीस उपाआयुक्त मंचक इप्पर, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, आयोजक माजी नगरसेवक संदीप वाघेरे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, जेष्ठ नागरिक संघाचे शांताराम सातव, माजी नगरसेवक संतोष कुदळे, शुभांगीताई वाघेरे, सुभाष वाघेरे, दीपिका कापसे आदी यावेळी उपस्थित होते.

Related posts