बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का? कुंडली जाणून घेण्यासाठी ज्योतिष विभागाची मदत घ्येणाचा कोर्टाचा अजब आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Allahabad High Court :  एका बलात्काराच्या खटल्यात तरुणीची कुंडली जाणून घेण्यासाठी लखनौ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाची मदत घेण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टानं दिले होते. मात्र, या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. लग्नाचं आमीष दाखवून बलात्कार केल्याचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, बलात्कार पीडित तरुणीला मंगळ होता का, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडून कुंडली मागवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते (Jyotish Mangalik). 

23 मे रोजी कोर्टाने हे आदेश दिले होत. तरुणीला मंगळ असल्यानं लग्न करता येणार नाही, अशी भूमिका आरोपीनं घेतली होती. मात्र, आता हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

लखनऊ मधील हे प्रकरण आहे. आरोपीने लग्नाचे अमिश दाखवून पीडीत तरुणीसोबत अनेकदा शारिरीस संबध प्रस्थापित केले होते. मात्र,  मंगळ असल्यानं लग्न करता येणार नाही असं म्हणत तरुणाने लग्नास नकार दिला होता.  15 जून 2022 रोजी  तरुणीने  चिनहट पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

मुलीला मंगळ असल्याचा आरोपीचा कोर्टात दावा

आरोपीला अचक करुन पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल. सुनावणी दरम्यान आरोपीने मुलीला मंगल असल्याने लग्न करु शकत नाही असा दावा कोर्टात केला. यानंतर कोर्टाने खरचं मुलीला मंगल आहे का हे तपासण्यासाठी ज्योतिषांची मदत घ्यावी असे आदेश दिले होते. 

नुकत्याच जन्मलेल्या बाळाची कुंडलीही दिली 

बाळाच्या जन्माबरोबरच पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिलं जाण्याची उदाहरणं बरीच आहेत. मात्र, आता बाळाच्या जन्माबरोबरच नुकत्याच जन्मलेल्या बाळाची कुंडलीही दिली जात आहे. राजस्थानातल्या जयपूरमधल्या युनिक संगीता मेमोरियल रुग्णालयानं ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी भारतीय प्राच्य ज्योतिष शोध संस्थेशी या रुग्णालयानं संलग्नता घेतली आहे. त्या आधारे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र, या दोन्ही पद्धतींनी रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांवर उपचार केले जातात. 

 

Related posts