Rohit Sharma And Team India Have Reached Mumbai For The Semi Finals World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 : विश्वचषकातील साखळी सामन्यात भारतीय संघाने दादागिरी केली. टीम इंडियाने प्रतिस्पर्धी संघांचा पालापाचोळा केला. टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारखे संघ पाणी कम दिसले. पण आता उपांत्य फेरीसाठी भारतीय संघ तयार झालाय. उपांत्य फेरीत भारतापुढे बलाढ्य न्यूझीलंडचे आव्हान आहे. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला. मुंबई विमानतळावर रोहित शर्मा याला स्पॉट करण्यात आले. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी आणि मुलगीही होती. रोहित शर्माने लेकीला कडेवर घेतले होते. चाहत्यांच्या गरड्यातून वाट काढत रोहित शर्माने विमानतळावरुन निघाला. चाहत्यांनी रोहित आणि टीम इंडियासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्या तीव्र आवाजामुळे रोहितच्या मुलीने कानावर हात लावले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. 

भारतीय संघ मुंबईत दाखल – 

अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा तब्बल 160 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल झाली. शार्दूल ठाकूर, शुभमन गिल, अश्विन यांच्यासह सपोर्ट स्टाप यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. त्याशिवाय इतर भारतीय खेळाडूही मुंबईत दाखल झाले आहेत. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या कपललाही विमानतळावर स्पॉट करण्यात आले. भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. सर्व चाहत्यांना रोहित अॅण्ड कंपनीकडून विश्वचषक विजयाची अपेक्षा आहे. 

भारतीय संघाने साखळी सामन्यात सर्वच विजय मिळवले. नऊ सामन्यात नऊ विजय मिळवत टीम इंडिया अजेय राहिली. भारतीय संघापुढे इतर संघ सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुरु झालेली मोहिम आता मुंबईत सेमीफायनलपर्यंत पोहचली आहे. आता न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ फायनलचे तिकिट मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.



[ad_2]

Related posts