Diwali Padwa 2023 : बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Diwali Padwa 2023 : आज बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करण्यात येतो.साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दारावर सुरेख रांगोळी, दिव्यांचा आरास आणि आकर्षक रोषणाईचा हा दिवाळीचा सणातील एक सण म्हणजे दिवाळी पाडवा. या पाडव्याची प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते. या दिवशी नवऱ्याला पाटावर बसवून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे. वैवाहिक उज्ज्वल व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपलुकी, जिव्हाळा यात वाढ होण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते? (diwali padwa 2023 know history Balipratipad Why does the wife wave to her husband at padwa and why is celebrated diwali padwa)

बलिप्रतिपदेला कसली पूजा करतात? 

बलिप्रतिपदा म्हणजे बली पूजा करण्याचा दिवस. बली पूजेसोबत गोवर्धन पूजाही करण्यात येते. हा बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्यात येते. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले होते. असं म्हणतात जीवनात सुख समृद्धीसाठी आणि प्रत्येक कार्य सिद्धीस नेण्यासाठी या पूजेला महत्त्व आहे.  

दक्षिण भारतात ओणमच्या दिवशी राजा बळीची आणि उत्तर भारतात कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी राजा बळीची पूजा करण्यात येते. 

बलिप्रतिपदेची आख्यायिका 

बलिप्रतिपदेची एक आख्यायिका आहे, त्यानुसार एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीनची मागणी केली होती. यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे दोन पायऱ्यांमध्ये मोजमाप केलं होतं. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरं पाऊल कुठे ठेवायचं असं विचारलं तेव्हा बळीने त्याचं डोकं पुढं केलं. 

असं मानलं जातं की, बळीनं आपलं डोकं वामनाचं चरणी धरलं आणि वामनानं त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला होता. त्या वेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, प्रतिपदेला तुझी पूजा केली जाईल हा एक मोठा सण असेल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली असं म्हणतात.

महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला आहे. यादिवशी गोठा स्वच्छ केला जातो. मग शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळलं जातं. तर मेंढ्यांच्या कौतुकाचा सण धनगर समाजात केला जातो. आदिवासी समाज आज गुरांच्या बकऱ्यांची पूजा करतात. 

पाडवा पत्नी पतीला का ओवाळते?

पाडव्याला पत्नी पतीला का ओवाळते यावर पती लोकांचं ठरलेलं उत्तर म्हणजे आमच्या खिशाला कात्री लावण्यासाठीचा हा सण असतो. पण या मागे धार्मिक कारण आहे. या परंपेरामागील कारण माहिती असेल तर त्याला सणाला त्या पूजेला महत्त्व प्राप्त होतं आणि त्यातं पुण्य मिळतं. 

बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टींची, उपक्रमांची म्हणजेच नव्याची सुरुवात मानली जाते. विक्रम संवत कालगणेचा या दिवसापासूनच केली जाते. या मागील एक आख्यायिका अशी आहे की, उज्जैनचा राजा विक्रम आदित्य शतांचं आक्रमण परतून लावलं होतं. त्यांचा पाडव केला म्हणून या विजयाचं प्रतिक म्हणून विक्रम संवत कालगणाना सुरु केली. 

म्हणूनच दिवाळी पाडवा हा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यांच्यासाठी नवीन आर्थिक वर्ष सुरू मानली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांची हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून व्यापारी नवीन वर्षाचा प्रारंभ करता. 

तर दुसरीकडे बळी राजाने भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाची गोष्टी तुम्हाला माहिती आहे. विष्णूंची लिला पाहून पत्नी आणि देवी लक्ष्मी प्रसन्न झाली. त्यांनी पती विष्णूची औवाळणी केली आणि विष्णूंनी तिला ओवाळणी दिली. तेव्हा पासून पाडव्याचा सण सुरु झाला. 

या शुभ मुहूर्तावर ओवाळा पतीला!

दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 वाजून 14 मिनिटांपासून संध्याकाळी 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts