( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weekly Career Horoscope 27 November to 03 December 2023 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. बुध आणि शुक्र गोचरमुळे तयार होणारे राजयोग तुमच्या आयुष्यातील सर्व गणित सोडवणार आहे. कोणत्या लोकांसाठी हा आठवडा काय घेऊन आला आहे जाणून घ्या. (weekly horoscope money career prediction 27 November to 03 December 2023 Navam Pancham Yog and Malavya Rajyog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign)
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदी असणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. प्रवासातून सुखद अनुभव येणार असून अनेक ठिकाणी प्रवास करावे लागणार आहे. आळस टाळल्यास हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. मात्र या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांमुळे मन थोड उदास असेल पण आठवड्याच्या शेवट सगळं सुरळीत होणार आहे.
शुभ दिवस : 26,30
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही नवीन सुरुवात जीवनात प्रगतीचा मार्ग घेऊन येणार आहे. नवीन प्रकल्पातून फायदा होणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होणार असून नातेसंबंध सुधारणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणार आहात. हा आठवड्यातील प्रवास पुढे ढकलणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोड अस्वस्थ वाटेल.
शुभ दिवस : 26,27,28,29
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कोणताही नवीन प्रकल्प तुमच्या भविष्याची चिंता मिटवणार आहे. आर्थिक लाभासाठीही शुभ आठवडा सिद्ध होणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला अतिशय लाभ होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचेही शुभ परिणाम तुमचं आयुष्य बदलणार आहे. कुटुंबात संयम ठेवून घेतलेले निर्णय तुम्हाला शुभफळ देणार आहे. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायद्याचे ठरणार आहे.
शुभ दिवस: 26,28,29,30
कर्क (Cancer Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. या आठवड्यापासून आर्थिक संपत्तीत वाढ होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवास मात्र त्रासदायक ठरणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये बाह्य हस्तक्षेप तुमच्या नात्यात तणाव निर्माण करेल. या आठवड्यातील आर्थिक स्थिती बँक बॅलेन्स वाढवणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद तुमच्या आयुष्यात येणार आहे.
शुभ दिवस: 26,28,29
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवडा चांगला सिद्ध होणार आहे. आर्थिक लाभामुळे बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार आहे. तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकाराचं भांडण टाळणं तुमच्या हिताचं असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात आनंद घेऊन येणार आहे. तुम्ही केलेल्या योजना या आठवड्यात यशस्वी होणार आहेत.
शुभ दिवस: 29,30,1
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती वाट पाहत आहे. अचानक तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. कठोर परिश्रम तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला हा आठवडा जरा खर्च होऊ शकतो. शिवाय कामात अडथळे येऊ शकतात.
शुभ दिवस: 26,28,29,1
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि आनंदी ठरणार आहे. कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार आहे. घरातील सजावटीमध्ये तुमचं मन रमणार आहे. कुटुंबासोबत खरेदी करणार आहात. आर्थिक लाभामुळे पैशांची समस्या दूर होणार आहे. तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचं आहे. भावनिक कारणांमुळेही कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
शुभ दिवस: 29,30,1
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी बदल घेऊन आला आहे. काही नवीन प्रकल्पाकडे तुम्ही आकर्षित होणार आहात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित करण्यात यशस्वी होणार आहात. कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश मिळणार आहे. आर्थिक खर्च जास्त होणार असून आठवड्याच्या शेवटी जरा एकटं वाटू शकतं.
शुभ दिवस: 26,28,29
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. प्रवासात अडचणी वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये अधिक खर्च होणार असून मालमत्ता खरेदीमध्ये जास्त वेळ आणि पैसा जाणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी उत्सव साजरा करण्याचा मूड असणार आहे.
शुभ दिवस: 26,28,1
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात प्रसन्नदायी असणार आहे. प्रकल्पातून तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. या आठवड्यात तुमचा सहलीचा मूड असणार आहे. नयनरम्य आणि सुंदर ठिकाणी जाण्याचा बेत तुम्ही आखणार आहात. या आठवड्यातील प्रवास सुखद अनुभव देणारा ठरणार आहे. हा आठवडा तुमचा खर्चिक असणार आहे. आरोग्यासाठी खर्च होणार आहे.
शुभ दिवस: 26,27,30
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवडा शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. अनेक वर्षांनी एखादा व्यक्ती तुम्हाला भेटल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. या आठवड्यात प्रवासात यश घेऊन आला आहे. आर्थिक बाबतीत वेळ हळूहळू सुधारणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मर्यादा येणार आहात. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या प्रियजनांसोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात.
शुभ दिवस: 28,29,30,1
मीन (Pisces Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत भाग्यशाली ठरणार आहे. सुरुवातीला कोणत्याही नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला चिंता सतावणार आहे. मात्र नंतर तुम्हाला गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढणार आहेत. कुटुंबावर लक्ष केंद्रित करून कोणताही निर्णय विचारपूर्व घेतल्याने फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद होण्याची दाट शक्यता आहे.
शुभ दिवस: 27,29,30
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)