Yearly Horoscope 2024 : नववर्षात ‘या’ राशींना करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yearly Horoscope 2024 : हे वर्ष संपायला फक्त महिना बाकी राहिला त्यामुळे येणारं वर्ष 2024 कसं असेल प्रत्येकाला जाणून घ्यावस वाटतं. ज्योतिषशास्त्र यात आपल्याला मदत करतो. येणारं हे नवीन वर्ष काही राशींसाठी घातक असणार आहे. करिअर, पैसा, आरोग्याबाबत त्या लोकांना अधिक सावधगिरी बाळगावी लाणगार आहे. (Yearly Horoscope 2024 In the new year these zodiac signs should be careful about career money health if not)

‘या’ राशींनी राहवं लागणार सावधान!

वृषभ (Taurus Zodiac) 

2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला नसणार आहे. नवीन वर्ष तुम्हाला अधिक खर्चिक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना 1 मे 2024 पर्यंत आग आणि धारदार शस्त्रांपासून काळजी घ्यावी लागणार आहे. नाही तर, मोठी दुर्घटनेची भीती आहे. 1 मे नंतर या राशीच्या लोकांचं आयुष्य रुळावर येईल. कारण त्यानंतर गुरु ग्रह या राशीच्या कुंडलीत येणार आहे. त्याशिवाय प्रेम संंबंधामध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याशिवाय नवीन वर्षात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कर्मदाता शनीदेव वर्षभर तुमच्या कुंडलीतील दशम भावात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार नाही. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राहूमुळे तुमच्या जीवनात चढ-उतार असणार आहे.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना 2024 मध्ये बुध आणि शुक्रामुळे खर्चात टाकणार आहे. त्याशिवाय तुम्हाला आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक समस्या तुमची प्रत्येक क्षणाला वाट पाहत असणार आहे. येणारं वर्ष तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेऊ नका, अन्यथा मोठ्या संकटात तुम्ही सापडाल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. केतूमुळे कौटुंबिक समस्या वाढणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

येणारं वर्ष 2024 हे धनु राशीच्या लोकांना कठीण असणाार आहे. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. या वर्षी तुम्ही वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. अन्यथा तुमचा मोठ्या अपघाताला बळी होण्याची भीती आहे. रागाच्या भरात काहीही बोलणं किंवा वागणं टाळा, नाही तर आयुष्यात मोठा भूकंप येऊ शकतं. धनु राशीच्या लोकांना कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. 2024 मध्ये धनु राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनावरही नकारात्मक परिणाम करेल. तुमच्या प्रेमसंबंधांमध्येही चढ-उतार पाहिला मिळणार आहे. या वर्षी तुमचं नशीब थोडं कमजोर असणार आहे. गुरू तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करणार आहे, त्यामुळे तुमचं आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्वच क्षेत्रात चढ-उतारांना सामोरं जावं लागणार आहे. राहू-केतूमुळे वर्षभर करिअरमध्ये अडचणी असणार आहे. काही कठीण प्रसंग तुमच्या वाट्याला येणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts