Chance of rain in maharashtra for next 48 hours

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज देशासह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता


हवामान अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

राज्याच्या दक्षिण भागात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. (Maharashtra Rain)

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

पुढील ४८ तासांत विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पाऊस पडेल. पावसामुळे तापमान कमी होईल. येत्या तीन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धुक्याची चादर दिसून येईल.

पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता


अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदिया येथे पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

डिसेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा


[ad_2]

Related posts