Shani Transit In Kumar Stage Rain of money will fall on these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Transit In Kumar Stage: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये अनेक ग्रह वेळोवेळी त्यांच्या कुमार आणि युवाच्या अवस्थेत जातात. शनी देवांच्या या स्थितीता प्रभाव मानवी जीवनावर अनेकदा होताना दिसून येतो. 

शनिदेवाने नुकतंच कुमार अवस्थेत प्रवेश केला आहे.  कारण त्याने 7 डिग्रीने हालचाल करण्यासा सुरूवात केली आहे. यावेळी शनी 12 अंशापर्यंत कुमार अवस्थेत राहणार आहेत. अशा स्थितीत शनिदेव कुमार अवस्थेत राहिल्यामुळे काही राशींना याचे चांगले परिणाम मिळू शकणार आहेत. या काळात काही राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.  

मेष रास (Aries Zodiac)

कुमार अवस्थेतील शनिदेवाचा प्रवास या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुमचे उत्पन्न वाढेल. मिळून केलेली कामे पूर्ण होतील. काहींना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. तुमचं काम किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित असल्याने तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

सिंह रास (Leo Zodiac)

शनिदेवाचे कुमार चरणात होणारं गोचर तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीतील विवाहित जीवनातील घरातील कुमार चरणात भ्रमण करणार आहेत. याशिवाय त्याने शश राजयोगही घडवला आहे. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

शनिदेवांचं कुमार अवस्थेतील भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या भाग्यस्थानी शनिदेवाचं भ्रमण होतंय. त्यामुळे तुम्ही भाग्यवान होणार आहात. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. देश-विदेशातील प्रवासाचे लाभ होतील. 

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी कुमार चरणात शनीची चाल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. कौटुंबिक मतभेद मिटू शकणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा स्थिती बदल फलदायी ठरेल. या काळात तुम्हाला व्यवसायातही चांगला नफा मिळेल. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts