[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Exit Polls 2023 : एबीपी-सी व्होटरचा सर्वात मोठा, लक्षवेधी, अचूक एक्झिट पोल Assembly Elections 2023
Poll Of Exit Polls Results 2023 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरू असून 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. खरंतर ही निवडणूक जरी विधानसभेची (Assembly Election Results) असली तरी ही लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम असल्याचं समजलं जातंय. या पाच राज्यांच्या निवडणुकांत उडालेला धुरळाच, लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला विजयाचा गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चारणार हे ठरवू शकेल. म्हणूनच, एबीपी माझा आणि सी-वोटरने या पाच राज्यांचा सर्वात मोठा, सर्वात लक्षवेधी आणि सर्वात अचूक असा एक्झिट पोल केला. या एक्झिट पोलमध्ये अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि धक्कादायक अशा तिहेरी हिंदोळ्यांवर झुलणारे अंदाज समोर आले आहेत. राजस्थानच्या गळ्यात भाजपच्या कमळाचा हार पडणार असल्याचं चित्र आहे आणि राजस्थान काँग्रेसचा हात सोडणार, असा अंदाज सर्व्हेतून समोर आलाय. तर तिकडे मध्य प्रदेशातलं भाजपचं कमळ यावेळी कोमेजणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेलंगणात मात्र काँग्रेस कडवी झुंज देत, महाराष्ट्रात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या, चंद्रशेखर राव यांना चारीमुंड्या चीत करणार, असं सर्वेक्षण सांगतंय. महत्त्वाचं म्हणजे, 2018 साली काँग्रेसचा पकडलेला हात, छत्तीसगड यावेळीही घट्ट पकडून ठेवणार, असा सर्व्हेचा अंदाज आहे.
[ad_2]