( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sifakas- Angels of the forest: शहरीकरण वाढत असताना जंगल वाचवणे आणि समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. पण तुम्हाला माहित्येये जंगलांना शहरीकरणापासून वाचवण्यासाठी आणि निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी जंगलातील प्राणीही तितकीच काळजी घेत असतात. जंगलातील प्राण्यांचा दरारा तर तुम्हाला माहितीच असले. यातील एक प्राणी म्हणजे सिफाकास (Sifakas) या प्राण्याला जंगलाचा देवदूत असं म्हणतात. मर्कट कुळातील हा प्राणी असून जमीनीपासून उंच उड्या मारणे हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. इतकंच काय त्याच्या चालही वेगळीच असते.
सिफाकास हा एका बाजूने उड्या मारत चालतो यामुळं त्याला डांसिंग लेमर्स (Dancing Lemurs) देखील म्हटलं जाते. हा प्राणी जगातील सर्वात चौथ्या मोठ्या मादागास्कर द्वीपवर आढळला जातो. शरीरावर सफेद रंग असल्याच्या कारणामुळं त्याला जंगलाचा देवदूत असंही म्हटलं जाते. आता या प्राण्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
look at these hopping
lemurs AmazingNature pic.twitter.com/axGwxNDXDi(@SimplyNature8) May 8, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @SimplyNature8 नावाच्या युजरने या व्हिडिओ (Sifakas Twitter Viral Video) पोस्ट केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला हजारोंच्या संख्येत व्ह्यूज मिळाले आहेत. सिफाकास या प्राण्यात उंच उड्या मारण्याचे वेगळेच कौशल्य आहे. त्यांचे डोळे नारंगी रंगाव्यतिरिक्त इतर रंगाचेही असतात. स्थानिक मालागासी लोकांनी (Local Malagasy People) सिफाकासच्या अनोख्या आवाजामुळं ठेवलं आहे. हा आवाज ‘शिफ-औक’ (shif-auk) सारखा येत असल्याने त्याला हे नाव ठेवले गेले.
राष्ट्रीय जिओग्राफीच्या रिपोर्टनुसार, सिफाकास त्यांचा बहुतांश वेळ झाडांवरच व्यतित करतात. मात्र, अन्य लीमरप्रमाणे इकडे-तिकडे फिरत नाहीत. सिफाफ ताठ उभे राहतात व त्यांच्या मागच्या पायांनी उडी मारुन एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडी मारतात. या पद्धतीने ते 30 फुटांचे अंतर कापतात. ते जमिनीवरही वेगाने चालतात. तसंच, दोन पायांनी उडी मारण्यास ही ते सक्षम असतात.
सिफाफा हा खूपच सुंदर प्राणी आहे. ते शाकाहारी असून पाने, फुल, फळ, कळ्या आणि खोड हे त्यांचे मुख्य अन्न आहे. सिफाफा जवळपास शंभर वेगवेगळी पाने खाण्यासाठी ओळखले जातात. ते सूर्योदयाच्या आधी चारा शोधतात आणि सूर्यास्तानंतर झाडावर झोपतात.