Mizoram Election Results 2023 Who Is Lalduhoma Ex IPS Officer Probable ZPM Chief Ministerial Face

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mizoram Election Result 2023 : मिझोराम विधानसभेत (Mizoram Election Result 2023) सत्तांतर झालं आहे. झोरम पीपल्स मूव्हमेंट (Zoram People’s Movement) राज्यात सरकार स्थापन करणार आहे. झेडपीएमने 27 जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front) 10 जागांवर मर्यादित राहिला. भाजप 2 जागांवर आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा असून बहुमताचा आकडा 21 आहे. मिझोराममध्ये सीएम झोरमथंगा यांची एमएनएफ सत्तेत होती. मिझोरामची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती, परंतु निवडणूक आयोगाने मिझोरममधील निकालाची तारीख बदलली होती. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुकीच्या तारखेत बदल करण्याची मागणीही केली होती. पत्रात असे म्हटले आहे की मिझो लोक रविवारी पूजा करण्यासाठी मग्न असतात. 

सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला झटका (Mizo National Front)

मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) सरकारला ट्रेंडमध्ये मोठा झटका बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिझोराममध्ये एवढा मोठा जनादेश मिळणाऱ्या झेडपीएमची स्थापना चार वर्षांपूर्वीच झाली होती. दरम्यान, झेडपीएम पक्ष कसा अस्तित्वात आला आणि पक्षप्रमुख माजी आयपीएस लालदुहोमा यांनी राज्याचे राजकीय समीकरण कसे बदलले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लालदुहोमा यांच्या झेडपीएमचा झंझावात (Zoram People’s Movement)

माजी आयपीएस असलेल्या लालदुहोमा (Who is Lalduhoma) यांनी झोरम राष्ट्रवादी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. ते याच माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. दुसरीकडे, लालदुहोमांच्या पक्षाने राज्यातील इतर पाच छोट्या पक्षांसोबत युती केली. ज्यानंतर त्या युतीचे राजकीय पक्षात रूपांतर झाले, जे ZPM (झोरम पीपल्स मूव्हमेंट) पार्टी या नावाने 2017 मध्ये अस्तित्वात आले.

माजी आयपीएस लालदुहोमा कोण? (Who Is Lalduhoma)

मिझोराममधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या झेडपीएमचे अध्यक्ष लालदुहोमा हे मिझोरामचे माजी आयपीएस अधिकारी आहेत. 1972 ते 1977 पर्यंत लालदुहोमा यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम केले. पदवीनंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. 1977 मध्ये आयपीएस झाल्यानंतर त्यांनी गोव्यात स्क्वॉड लीडर म्हणून काम केले. त्यांच्या तैनातीदरम्यान त्यांनी तस्करांवर मोठी कारवाई केली. पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चर्चा होऊ लागली. 1982 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची सुरक्षा प्रभारी म्हणून नियुक्ती केली. पोलीस उपायुक्त म्हणून विशेष बढती देण्यात आली. राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1982 च्या आशियाई खेळांच्या आयोजन समितीचे ते सचिवही होते.

लालदुहोमांचा राजकीय प्रवेश कसा झाला?

1984 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये लालदुहोमा लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले. 1988 मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यात आले, त्यामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले.

लालदुहोमांच्या प्रयत्नांमुळे झेडपीएम (ZPM) अस्तित्वात

लालदुहोमांच्या प्रयत्नांमुळे झेडपीएम (ZPM) अस्तित्वात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत लालदुहोमा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लालथनहलवा यांचा दारूण पराभव केला, त्यानंतर ते राजकीय वर्तुळात चर्चेत आले. त्यावेळी लालदुहोमा यांनी स्थापन केलेल्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळू शकली नाही, त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली.

ZPM ला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता

काही काळानंतर ZPM ला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. यावेळी लालदुहोमा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच आधारावर त्यांना विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले. 27 नोव्हेंबर 2020 रोजी लालदुहोमा मिझोराम राज्यातील विधानसभेचे सदस्यत्व गमावणारे पहिले आमदार बनले. मात्र, राजकीय जाणकार या घटनेला लालदुहोमासाठी संजीवनी ठरत आहेत. 2021 मध्ये सेरछिप जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी हा मुद्दा बनवला होता. या पोटनिवडणुकीत त्यांना पुन्हा विधानसभेवर पाठवण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts