“15 वर्षं खोटं बोलून बोलून मी आता थकलोय”, तरुणाने थेट पोलिसांना लावला फोन, जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: एखादा गुन्हा केल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्यभर जगणं अनेकदा कठीण असतं. आपल्या हातून गुन्हा घडलाय याची जाणीव सतत होत असल्याने मनात अपराध्याची भावना कायम असते. अशाचप्रकारे एका तरुणाला 15 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा छळत होता. यानंतर त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपण वारंवार खोटं बोलू थकलो असल्याचं सांगत त्याने पोलिसांना फोन लावला आणि 15 वर्षांपूर्वी केलेल्या त्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने फोनवर जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. 

तरुणाने पोलिसांना फोन करुन आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. 15 वर्षांपूर्वी त्याने काही कारण नसताना त्याच्या घरमालकाची हत्या केली होती. मात्र यानंतरही इतकी वर्षं तो अटकेपासून वाचला होता. 37 वर्षीय टॉनी पेरालटा याने पोलिसांना फोन करुन जेव्हा ही कबुली दिली, तेव्हा 2008 मधील एक बेपत्ता प्रकरणं बंद झालं. 

हे अमेरिकेतील प्रकरण आहे. 60 वर्षीय विलियम ब्लॉजगेट अचानक बेपत्ता झाले होते. पोलिसांना ना त्यांचा मृतदेह आढळला होता, ना कोणाला अटक केली होती. टॉनी याने 1 मे रोजी रोजवेल पोलिसांना फोन लावला होता. त्यावेळी तो एका दुकानात होता. पोलिसांना धुम्रपान करताना तो सापडला होता. आपण खोटं बोलून बोलून आता थकलो असून, हा गुन्हा सतत आपल्याला सतावत असतो असं त्याने पोलिसांना सांगितलं. 

मिरर यूकेने दिलेल्या, यानंतर तो खुर्चीवर उभा राहिला आणि काही न बोलता आपले दोन्ही हात मागे घेतले जेणेकरुन पोलीस बेड्या ठोकू शकतील. यानंतर तो पोलिसांच्या गाडीपर्यंत गेला. त्याने पोलिसांचे आभारही मानले. 

रिपोर्टनुसार, टॉनीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांना शंका होती. कारण त्यांना टॉनी ज्या हत्येची कबुली देत आहे त्याची काही माहिती आठवत नव्हती. पण टॉनी याने त्यांना आपण ज्याठिकाणी घरमालकाचा मृतदेह लपवला आहे त्या जागी नेतो असं सांगितल. पोलिसांनी ते ठिकाण पाहिल्यानंतर खोदून पाहिलं असता तिथे बुटं, हाडं, कवटी आणि बेपत्ता व्यक्तीचा फोन आढळला. यानंतर पोलिसांनी त्याची ओळखही पटवली. 

चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं की, घरमालक चांगला होता. पण ड्रग्जचं व्यसन केलं असल्याने त्याने त्याच नशेत विनाकारण हत्या केली होती. स्क्रू ड्रायव्हरने त्याने ही हत्या केली होती. 

विलियम ब्लॉजगेट 3 जानेवारी 2009 रोजी बेपत्ता झाले आहेत. कुटुंब 10 दिवस त्यांचा शोध घेत होतं. पण ते सापडले नव्हते. तपासात पोलिसांना भाडेकरु टॉनीशी त्यांचा वाद असल्याची माहिती मिळाली होती. त्याची चौकशीही केली होती. पण त्यावेळी पोलिसांच्या हाती काही लागलं नव्हतं. पण आता मात्र त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. 

Related posts