[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मासिक पाळी जास्त दिवस येते
ज्या महिलांमध्ये कफ दोष असतो, त्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात रक्तस्राव हा ना अधिक असतो ना कमी. मात्र या महिलांना मासिक पाळी एक आठवडा अथवा त्यापेक्षा अधिक दिवस येऊ शकते आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. तसंच रक्ताचा रंग लालभडक नसून फ्लो सतत चालू राहतो.
थकवा आणि जडपणा
मासिक पाळीच्या दरम्यान कफ दोष असणाऱ्या महिलांना सतत थकवा जाणवतो आणि शरीरात जडपणाही जाणवत राहोत. तसंच कफ दोष असणाऱ्या महिलांना या काळात अधिक काळ झोपून राहावे वाटते.
(वाचा – Weight Loss: संध्याकाळी चालण्यानेही कमी होईल वजन, सोप्या टिप्सचा करा वापर)
पाळीदरम्यान बद्धकोष्ठता
मासिक पाळीदरम्यान कफ दोष असणाऱ्या महिलांना बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. तर काही महिलांना जुलाबही होतात. याशिवाय दिवसभर उलटी येत असल्यासारखेदेखील जाणवते. हे अत्यंत कॉमन आहे.
स्तनावर सूज
अनेक महिलांना ज्यांना कफाचा त्रास आहे, त्यांच्या स्तनावर मासिक पाळीच्या काळात सूज आलेली जाणवते. तसंच पायाच्या खालच्या भागातही हलकीशी सूज येऊ शकते. स्तनांना आलेल्या सुजेमुळे दिवसभर स्तन ओढल्यासारखे वाटू शकते.
(वाचा – Weight Loss: लोण्यासारखी चरबी वितळविण्यासाठी वापरा हे तेल, वजन होईल त्वरीत कमी)
भावनिक त्रास
मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे केवळ शरीरच नाही तर भावनिकरित्याही महिलांना खूपच त्रास होतो. कफदोष असणाऱ्या महिला या मासिक पाळीच्या काळात अधिक भावनिक होतात आणि लहानसहान गोष्टीतही भावुक होतात.
हार्मोनल असंतुलन
मासिक पाळीदरम्यान डिस्चार्ज, मूड स्विंग्ज, क्रॅम्प्स अथवा अधिक रक्तस्राव असा त्रास होत असेल तर हार्मोनल असंतुलनाचा त्रास होतोय हे समजून जावे. कफदोष असणाऱ्या महिलांना हा त्रासदेखील होऊ शकतो.
[ad_2]