[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यापद्धतीने आहाराकडे पाहतात
कोरियन लोकांच्या आयुष्यात अन्नाला औषध म्हणून पाहिले गेले आहे आणि कोरियन संस्कृती अन्न पोषण आणि उपचाराचा स्त्रोत म्हणून पुनरुच्चार करते. सामान्यत: भाज्यांचे प्रकार, सूप, किमची, तांदूळ आणि सीफूड असलेले, पारंपारिक कोरियन पाककृती सामान्यतः आरोग्यदायी असते. फरमेंटेशन करण्यापेक्षा भाजणे, उकळणे, लोणचे आणि ब्लँचिंग या सामान्य स्वयंपाक पद्धतीचा कोरियन जीवनशैलीत समावेश आहे.
(वाचा – Health Tips : तज्ज्ञांनी सांगितला समोसा-पिझ्जा-बर्गर खाण्याची योग्य पद्धत, अजिबात वाढणार नाही वजन)
अशी असते खाण्याची पद्धत
मुळातच कोरियन लोकांची आहारपद्धतीत कमीत कमी प्रक्रिया केलेल्या असतात. कोरियन लोक आहारात भाज्यांचा समावेश सर्वाधिक करतात. ज्या अतिशय कच्च्या, कमी शिजवलेल्या आणि फार मसालेदार नसतात.
(वाचा – Diet Plan After 40 : चाळीशीत जरूर खा या १० गोष्टी, शरीरात १०० च्या स्पीडने धावेल रक्त, म्हातारपण होईल छुमंतर)
प्रोटीनकरता काय करतात
कोरियन लोकांचा आहार हा प्रोटीनयुक्त असतो यामध्ये मांसाहाराचा देखील समावेश असतो. यामध्ये अंडी, मासे, मीट आणि सी फूडचा देखील समावेश असतो. महत्वाचं म्हणजे या सगळ्याचे प्रोर्शन मात्र अतिशय कमी असते.
(वाचा – शौचाच्यावेळी हे ५ संकेत सांगतात की आतड्यांमध्ये झालेत किडे, आतड्यांना पिळवटून खराब करतात आरोग्य)
हा असतो मांसाहाराकरता पर्याय
कोरियन लोकं मांसाहाराला पर्याय म्हणून पुढील पदार्थांचा समावेश करतात. ज्यामध्ये टोफू, किंग ऑयस्टर मशरूम, सुकवलेले मशरूम याचा समावेश करतात. यामुळे त्यांना चांगली ताकद मिळते. आणि सुडौल शरीर प्राप्त होतं.
(वाचा – बाबा रामदेव यांचे ७ घरगुती उपाय, मुळापासून उपटून काढतील कोलेस्ट्रॉल, हाय बीपीसारखे गंभीर आजार )
भाताचा कसा करतात समावेश
अनेक पाककृतींमध्ये पांढरा भात आणि तांदूळ नूडल्सचा समावेश कोरियन आहारात केला जातो. डंपलिंग, पॅनकेक्स किंवा ग्लास नूडल्स हे तांदळाचे उत्तम पर्याय आहेत.
(वाचा – मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्या हे घरगुती पेय, अगदी तीन दिवसांतच येतील Periods)
हा आहार आवर्जून टाळतात
कोरियन आहार गहू आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापरास प्रोत्साहन देत नाही. जेवण दरम्यान स्नॅकिंगला कडाडून विरोध केला जातो. तसेच प्रक्रिया केलेला आहार, जास्त चरबीयुक्त किंवा साखरयुक्त पदार्थांचा देखील आहारात समावेश नसतो. याचा अर्थ असा नाही की हे पदार्थ पूर्णपणे काढून टाकातात.
(वाचा – World Bicycle Day : दररोज किती मिनिटे सायकलिंग करणे योग्य, ज्यामुळे मिळतील असंख्य फायदे, आजच सुरू करा )
कोरियन लोकं हे फॉलो करतात
- कमी कॅलरीज खाणे.
- नियमित व्यायाम करणे
- अनेकदा चालण्याचा पर्याय स्वीकारणे
- चरबीयुक्त पदार्थ कमी खाणे
- साखर कमी खाणे
- स्नॅक्स टाळणे
(वाचा – दूध-चपाती खाताय? एक्सपर्टकरून पहिले फायदे-नुकसान जाणून घ्या)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]