3 हजार वर्ष प्राचीन मूर्तीवर दिसला QR Code; पुर्वजांना भविष्य पाहता येत होतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Statue With QR Code: जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जमिनीच्या आत रहस्यमय आणि प्राचीन मूर्त्या किंवा नाणी सापडत असतात. भारतात आजही अनेक ठिकाणी अशा प्राचीन आणि पुरातन वास्तु सापडत आहेत. अलीकडेच एक मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. आश्चर्य म्हणजे, आजच्या काळात सर्रास QR कोड वापरला जातो.  मात्र, 3000 वर्ष जुन्या असलेल्या मूर्तीवर क्युआर कोडसारखी आकृती आहे. तीन हजार वर्षापूर्वी क्युआर कोडसारखी आकृती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर या मूर्तीचा फोटो Mysterious World नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट आत्तापर्यंत 16 हजाराहून जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. तर, यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ही मूर्ती माया सभ्यताच्या काळातील असल्याचा दावा केला जातो. माया संस्कृती 1500 ईसवीसन पूर्व काळात मेक्सिको, होंडुरास, ग्वाटेमाला आणि युकाटन प्रायद्वीपमध्ये अस्तित्वात होती. युजर्स सोशल मीडियावर हा फोटो आणि पोस्ट शेअर करत या दाव्याचे समर्थन करत आहेत. हजारो वर्षांपूर्वी सापडलेली ही एक प्राचीन मूर्ती संशोधनकर्त्यांना सापडली आहे. या मूर्तीचे कनेक्शन माया संस्कृतीसोबत जोडलं जात आहे. 

विशेष म्हणजे, ही प्राचीन मूर्ती अन्य मूर्तींपेक्षा खूप वेगळी आहे. तुम्ही पाहू शकता की, या मूर्तीचे हात-पाय तर आहेत पण डोक्याच्या ऐवजी क्युआर कोडप्रमाणे आकृती बनवली आहे. व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून नेटकरीदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. तीन हजार वर्ष प्राचीन असलेली ही मूर्ती माया संस्कृतीमध्ये नक्कीच एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी बनवली असणार, असा दावा करण्यात येत आहे. 

QR कोडचा वापर ऑनलाइन पेमेंटसाठी केला जातो. मात्र, तीन हजार वर्षांपासूनच अशी आकृती अस्तित्वात असल्याचे पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या फेसबुक पोस्टवर युजर्स अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्सने म्हटलं आहे की, आपण पाहू शकतो की आपलं भविष्य कसं असू शकतं. तर, दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, एखाद्या खजिनापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग असू शकतो. तर, तिसऱ्या युजर्सने म्हटलं आहे, त्या काळातील लोक भविष्य पाहू शकत होते. 

Related posts