( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trending News In Marathi: लग्नाचा मांडव दारी पडला होता, सगळे पाहुणेदेखील लग्नासाठी आले होते. नवरदेव वरात घेऊन दारात आला. वरातीत नवरदेवाकडील नातेवाईक बेफाम होऊन नाचत होते. इतक्यात नवरदेवानेही त्याच्या आवडीच्या गाण्याची फर्माइश करत वरातीत सहभागी झाला. मात्र, नवरदेवाचा डान्स आणि वागणं पाहून वधुने थेट लग्नच मोडलं. लग्न लागण्याआधीच नवरीला एका संशयाने पछाडला त्याचा सोक्षमोक्ष लावताच तिचा संशय खरा ठरला.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जनपद येथील ही घटना आहे. नवरेदावाची वरात आल्यानंतर वधुपक्षाने त्यांचा मानपान केला. लग्नाचे विधी सुरू झाले. काही वेळातच वरमालाचा कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच नवरदेव त्याच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत डिजेच्या तालावर तल्लीन होऊन नाचत होता. डीजेच्या तालावर तो बेफाम होऊन नाचत होता. त्याचवेळी नवरीने त्याला पाहिले. तेव्हाच तिला संशय आला की नवऱ्याने खूपच दारू प्यायली आहे. तेव्हा तिने खरं खोट करण्यासा सांगितले.
वधुपक्षाने याबाबत चौकशी केल्यानंतर खरंच नवरदेवाने भरपूर दारू प्यायली असल्याचे समोर आले. जेव्हा जयमालासाठी नवरदेव स्टेजवर आला तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता आणि स्टेजवरच कोसळला. तेव्हा नवरीने स्टेजवरच असलेल्या तिच्या आईला सांगितली की मला याच्यासोबत लग्न करायचं नाहीये. नवरदेव व्यसनी आहे. नवरदेवाच्या या कृत्यामुळं लग्नाच्या कार्यक्रमाचा बेरंग झाला.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी नवरीला लग्न करण्यासाठी खूप मनवले. मात्र ती लग्नासाठी तयार झालीच नाही. जेव्हा कुटुंबीयांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांच्या खूप वाद-विवाद झाले. पंचायतदेखील बोलवण्यात आली. मात्र, नवरीने त्याच्यासोबत लग्न करण्यास साफ नकार दिला. मग वरात नवरीला न घेताच परत गेली. पण या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
नवऱ्याला दारूचे व्यसन आहे लग्नाच्या आधीच कळल्याने काहींनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर, नवरीने बरोबर निर्णय घेतला म्हणून तिच्या निर्णायाला सहमतीदेखील दिली आहे. मात्र, नवरदेवाच्या या वागण्यामुळं त्याच्या कुटुंबीयांची मान मात्र सर्व नातेवाईकांमध्ये खाली गेली आहे.