4 वर्षांत 11 खून, रिअल इस्टेट एजंटच्या वेषात फिरायला सिरीअल किलर, गुप्तधनासाठी…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Telangana Crime News: तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात 2020पासून तब्बल 11 जणांची हत्या करुन त्यांची संपत्ती व मालमत्ता लंपास केल्याप्रकरणी एका संशयित सीरिलय किलरला अटक करण्यात आली आहे. अलीकडेच या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. बेपत्ता असलेल्या 32 वर्षीय व्यक्ती व्यंकटेश याच्या पत्नीने 28 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. व यावेळी 47 वर्षीय आर सत्यनारायण याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी सत्यनारायण याला ताब्यात घेताच त्याने गेल्या चार वर्षात त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. तसंच तो गुप्तधन शोधून देतो असा स्वतःबद्दल दावादेखील करत असतो. आरोपीने तेलंगणातील नगरकुर्नुल आणि वानापर्थी जिल्ह्यामध्ये रियल इस्टेट एजंटच्या माध्यमातून व्यंकटेशसोबत संपर्क निर्माण केला. वानापर्थी येथील मूळ रहिवाशी असलेल्या व्यंकटेशने कोल्लापूरमध्ये असलेल्या त्याच्या एका जमिनीत लपलेल्या गुप्त खजिना शोधण्यासाठी सत्यनारायणची मदत मागितली होती. 

गुत्पधन शोधण्यासाठी आरोपीने व्यकंटेशजवळ भयानक अटी मांडल्या. त्या म्हणजे तीन गर्भवती महिलांचा बळी. ही अट ऐकून व्यंकटेशने नकार दिला. मग मात्र आरोपीने त्याच्याकडे 10 लाख रुपये मागितले. तेव्हापासूनच सर्वकाही भयानक घडत गेले. सत्यनारायण याने व्यंकटेशला 4 नोव्हेंबर रोजी एका सुनसान ठिकाणी बोलवले. आरोपीने त्याला पवित्र जल सांगून विष प्यायला दिले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपीने व्यंकटेशच्या तोंडात आणि शरिरावर घातक अॅसिड टाकले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायणने दिलेल्या जबाबात त्यांची ही क्रूर कृत्ये उलगडली. आरोपीने 2020नंतर केलेल्या सात गुन्ह्यात 10 लोकांची हत्या केल्याचे कबुल गेले. त्याने 2020 मध्ये रेवली, वानपर्थी येथे एका कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केली, 2021 मध्ये नगरकुर्नूल शहर आणि कोल्लापूर येथे प्रत्येकी एकाची हत्या केली आणि 2022 मध्ये नगरकुर्नूलमध्ये एका व्यक्तीची हत्या केली. 2023 मध्ये, कर्नाटकातील रायचूर आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पेद्दवदुगुरजवळ प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोपीने केलेल्या कृत्यांचा उलगडा होताच पोलिसांनाही धक्का बसला आहे. त्याला लवकरत लवकर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसंच, त्याला आता पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस कठोर कारवाई करणार आहेत. 

Related posts