Navneet And Ravi Rana Appeal Rejected By Court In Hanuman Chalisa Case Uddhav Thackeray Matoshree Maharashtra Amravati News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खासगी घराबाहेर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. राणा दाम्पत्याला हा मोठा धक्का आहे.

‘मातोश्री’बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलनप्रकरणी  नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली. खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. 

एफआयआर दाखल होण्यापूर्वीच केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा राणांचा दावा होता. कोर्टाने हा दावा फेटाळला. अतिरीक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर केला. 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालात 5 जानेवारीला आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार  आहे. दोषमुक्ती यचिका फेटाळल्यानंतर कोर्टाकडून खटल्याच्या कारवाईला सुरूवात झाली आहे.

[ad_2]

Related posts