Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, ‘या’ राशींचं लोक होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani, Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा कर्मदाता आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, शनिदेव हा जाचकाला त्याच्या कर्माचं फळ देतो. तुमचं कर्म चांगले असेल तर तुम्हाला फळ मिळतं. पण तुमचे कर्म वाईट असेल तर न्यायदेवता तुम्हाला कर्माची शिक्षा देतो. 9 ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्ष लागतात. याचा अर्थ तो एकाच राशीत पुन्हा येण्यासाठी 30 वर्षांच्या कालावधी लागतो. शनि ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम हा 12 राशींवर दिसून येतो. शनिचं संक्रमण हे शुभ असेल तर तुम्ही राजा बनवतो. तर अशुभ असल्यास राजालाही तो कंगाल करण्याची क्षमता ठेवतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा फायदा काही राशींना मिळणार आहे. त्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. (Shani Saturn will sit in Aquarius for 365 days the people of  this zodiac signs will be rich)

मेष रास (Aries Zodiac) 

2024 मध्ये शनीची चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शनिच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळणार आहे. समजूतदारपणात तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढणारं ठरणार आहे.आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. त्याच वेळी, या कालावधीत तुम्हाला अनेक नवीन गुंतवणूक पर्याय मिळणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

कुंभ राशीत बसलेला शनि तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. तुमच्या जीवनात सकारात्मकता येणार आहे. तब्येतीत काही चढ-उतार पाहिला मिळणार आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळणार आहे. त्याच वेळी, तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह फिरायला जाणार आहात. आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीतच शनिदेव विराजमान असल्याने या राशीच्या लोकांसाठी तो वरदान ठरणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. व्यावसायिकांना अनेक चांगले गुंतवणूकदार लाभणार आहे. लव्ह लाईफमध्ये काही चढ-उतार येतील मात्र ते बोलून सोडवता येणार आहे. तुमच्या करिअर जीवनात तुम्हाला अनेक कामं मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या वाढीस मदत होणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts