Chhattisgarh Crime Forcible unnatural sex with wife court sentences businessman to 9 years imprisonment;पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स, बड्या व्यावसायिकाला 9 वर्षाची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhattisgarh Crime : घरगुती अत्याचार, हिंसाचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. दरम्यान पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कोर्टाने अत्याचारी व्यावसायिक पतीला शिक्षा सुनावली आहे. काय आहे हा प्रकार? कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

छत्तीसगडमधील भिलाई-दुर्ग जुळ्या शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला कोर्टाने शिक्षा सुनावली. तो आपल्या पत्नीला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी कोर्टाने पीडित पत्नीच्या बाजुने निकाल दिला. पतीला नऊ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2007 मध्ये पीडित महिलेचे व्यावसिकासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगी झाली. दरम्यानच्या काळात तिला पतीच्या विचित्र स्वभावाची जाणिव झाली. लग्न झाल्यानंतर लगेच पत्नीला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलांनी कोर्टात दिली. धक्कादायक म्हणजे या काळात तिला जबरदस्ती अनैसर्गिक सेक्स देखील सहन करावा लागला. यात पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. तसेच हुंड्यासाठीही तिचा छळ केला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली. 

पतीच्या कृत्याला कंटाळून घर सोडले

पतीच्या अनैसर्गिक संभोगामुळे तसेच मानसिक छळाला कंटाळून पीडित पत्नीने तिला सासर सोडले. यातून तिने आपल्या मुलीला सिंगल मदर म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतला. ती 2016 मध्ये आपल्या मुलीसह माहेरी परत गेली. 7 मे 2016 रोजी तिने सुपेला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अनैसर्गिक संबंधासाठी आयपीसी कलम 377 आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी कलम 498  अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. 

न्यायालयाने दिला आदेश

गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता आरोपीला प्रोबेशनचा लाभ देणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. आरोपीचा गुन्हा आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत येतो. जो एक दंडनीय गुन्हा आहे. त्याला आयपीसी कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यासोबत त्याला 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. 

पतीच्या बहिणीलाही केले आरोपी

सुनावणीदरम्यान व्यावसायिकाच्या बहिणीचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला होता. ‘स्वेच्छेने दुखापत’ केल्याबद्दल पतीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तसेच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याच आरोपाखाली त्याच्या आई-वडिलांनाही प्रत्येकी 10 महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 

Related posts