[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India Economic Superpower: भारत (India) देश जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता (Economic superpower) कधी होणार? असा प्रश्न सातत्यानं समोर येत आहे. 2032 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर 2024-28 पर्यंत सरासरी भारताचा GDP हा 6.5 टक्के राहणार आहे. या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होईल. 2080 नंतर भारताचा जीडीपी चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त असेल असा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने (Centre for Economics and Business Research)आपल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल रिपोर्टमध्ये वर्तवला आहे.
भारताचा GDP चीनपेक्षा 90 टक्के आणि अमेरिकेच्या GDP पेक्षा 30 टक्के जास्त होणार
या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. भारताचा जीडीपी चीनच्या जीडीपीपेक्षा 90 टक्के आणि अमेरिकेच्या जीडीपीपेक्षा 30 टक्के मोठा असेल असा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने व्यक्त केला आहे. बिझनेस स्टँडर्डने जाहीर केलेल्या या अहवालानुसार, सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने म्हटले आहे की, 2024 ते 2028 पर्यंत भारताचा विकास सरासरी 6.5 टक्के दराने होईल, त्यानंतर 2032 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2032 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून मोठी अर्थव्यवस्था बनेल असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच CEBR च्या मते, 2080 नंतर, भारत चीन आणि अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल.
तरुण लोकसंख्येमुळं आर्थिक विकासाला मिळणार गती
CEBR च्या मते, भारताची मोठी आणि तरुण लोकसंख्या, वेगाने वाढणारा मध्यमवर्ग, गतिशील उद्योजकता आणि वाढती जागतिक आर्थिक एकात्मता यामुळं आर्थिक विकासाला गती मिळण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे. दारिद्र्य कमी करणे, असमानता, मानवी भांडवल, पायाभूत सुविधांचा विकास तसेच पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर भारताला उपाय शोधावे लागतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. यापूर्वी जुलै 2023 मध्ये, जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने म्हटले होते की, 2075 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. अहवालात असे म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल आणि जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकेल. मात्र भारत अमेरिकन अर्थव्यवस्थेला मागे टाकून चीननंतर दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं या अहवाल सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
दमरहा फक्त 1000 गुंतवा, 35 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळवा, नेमकी काय आहे योजना?
[ad_2]