मावळ तालुक्याचे भाग्यविधाते मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भाऊ भेगडे..

देहू वार्ताहर :- भारतीय जनता पार्टीचा मावळ तालुक्यातील गाव खेडयामध्ये विस्तार करण्याचे काम स्व. विश्वनाथ तात्या भेगडे यांनी मोठया ताकदीने व प्रचंड आत्मविश्वासाने केले. तात्यांच्या पश्चात मावळ तालुक्यातील भाजपाच्या आम कार्यकर्त्यांचा आधारवड म्हणुन संजय उर्फ बाळा भेगडे यांच्याकडे तालुक्यातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते पाहु लागले. स्व. केशवराव वाडेकर साहेब यांनी बाळभाऊच्या मधील नेतृत्व गुण ओळखुन त्यांना पक्ष संघटनेमध्ये वेगवेगळया जबाबदाऱ्या दिल्या व त्यांनी त्या पेलल्या देखील.भाजपा युवा मोर्चा तालुक्याची जबाबदारी पार पाडत असताना वेळोवेळी भाजपाच्या ज्येष्ठांचे त्याचप्रमाणे मा. आमदार रूपलेखा ढोरे व दिवगंत माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच लाभले. तालुक्यामध्ये भाजपा युवा मोर्चाची भक्कम संघटना बांधणी केली आणि त्याचे फळ म्हणुन २००९ मध्ये मावळ विधानसभेची उमेदवारी पक्षाने बाळभाऊंना दिली. तालुक्यामध्ये असणारा प्रचंड जनसंपर्क व संघटनेच्या बळावर बाळाभाऊ विजयी झाले आणि तालुक्याला एक युवा आमदार लाभला. मावळ तालुक्यामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविणे, तालुक्यामध्ये मुलभुत सुविधांसाठी मोठया प्रमाणात निधी आणुन मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू ठेवला आणि म्हणून दुस-यांदा बाळाभाऊंना पक्षाने विधानसभेची उमेदवारी जाहीर प्रचंड मताधिक्यांनी बाळाभाऊ विजयी झाले. दुस-यांदा आमदार झाल्यानंतर राज्यातील तरूण युवा आमदार म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातील नेत्यांचे लक्ष वेधले. पक्ष संघटनेमध्ये जिल्हयाची व राज्याची देखील जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन बाळाभाऊंना लाभले. बाळाभाऊंचे संघटनेवर जिवापाड प्रेम आहे. त्यांचा प्रत्यय उशिरा दौरा आटोपल्यानंतर देखील एखादा कार्यकर्ता आजारी असल्याचे कळल्यानंतर त्यास भेटण्यासाठी जातात. त्यांनी कधीच वेळेचा विचार केलेला नाही. कार्यकर्त्यांना आधार देणे, त्यांच्या पाठीशी सुख दुःखात उभे राहणे हा बाळाभाऊंचा स्थायीभावच आहे. पक्ष संघटनेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सर्वांना समान न्याय त्यांनी दिला आणि त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील “बाळाभाऊ” आपलेच वाटतात. बाळाभाऊंचा शांत स्वभाव व त्यांचे चेह-यावरील स्मित हास्य या सर्व यशाचे गमक आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी ने बाळाभाऊंना अनेक जबाबदा-या दिल्या. मग आमचे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक / गोवा विधानसभा तसेच पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक असो यामध्ये यशस्वी जबाबदारी पार पाडली व भाजपाचे उमेदवार देखील विजयी झाले. पक्षाने नुकतीच त्यांना महाराष्ट्रातील ४८ लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक म्हणून जबाबदारी दिली व ती जबाबदारी देखील ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. ४८ लोकसभा क्षेत्राचा प्रवास करत असताना आपल्या जिल्हयातील तालुक्यातील संपर्क त्यांनी कधीही कमी पडू दिला नाही. म्हणून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे एक उगवते बहु आयामी नेतृत्व म्हणून तमाम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठया आशेने त्यांच्याकडे पहात आहेत.

Related posts