


पिंपरी: 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संत तुकाराम नगर परिसरातील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे डॉक्टर डी.वाय पाटील होमिओपॅथिक महाविद्यालय संशोधन केंद्र यांच्यावतीने शिबिर घेण्यात आले.यामध्ये 340 हुन अधिक महिलांचे विविध चेकअप करण्यात आले.त्याचप्रमाणे महिलांसाठी खास ” तुझ्यात जीव रंगला ” या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला 1300 हुन अधिक महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ईश्वरी आनंद मातेरे – आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू मानसी पटवर्धन – मॉडेल पौर्णिमा कोल्हे – सामाजिक कार्यकर्त्या आकांक्षा पिंगळे – चित्रपट अभिनेत्री गायत्री फडके – राष्ट्रीय जलतरणपटू स्नेहल साखरे – आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू इशा सारसर – राष्ट्रीय शूटिंग खेळाडू शर्वरी शेंडे – आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू वैष्णवी जगताप – राष्ट्रीय जलतरणपटू रिशिता माने – रोलर हॉकी खेळाडू. या कार्यक्रमाचे आयोजन ” अखिल संत तुकाराम नगर महिला प्रतिष्ठान ” व सुजाताई सुनील पलांडे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिंदे-फडणवीस सरकार तर्फे घेण्यात आलेल्या शास्तीकर माफीच्या निर्णयाचा आनंद यावेळी साखर वाटप करून करण्यात आला.कार्यक्रमाचे सहसंयोजन ज्योती खत्री अनघा रुद्र, सतीश नागरगोजे, सार्थ पलांडे, मंगेश घाडगे यांच्या वतीने करण्यात आले होते.