Viral News Twins Baby Born in Differant Year and Time How Know Here; वेगवेगळ्या वर्षात जन्माला आली जुळी मुले, जन्मात 40 मिनिटांच अंतर, काय आहे हा चमत्कार?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील वेगवेगळ्या वर्षांत जन्माला आल्याचा एक नैसर्गिक चमत्काक घडला आहे. 

अमेरिकेत घडलेल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याचे कारण असे की, येथे जुळी मुले जन्माला आली, जी काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आली, पण वेगवेगळ्या वर्षांत! तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा चमत्कार कसा शक्य आहे?

जुळी मुलं जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात 

(फोटो क्रेडिट –  fox10phoenix.com)

एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या वर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने येल न्यू हेवन हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक चमत्कार पाहायला मिळाला. येथे जुळ्या मुलांचा जन्म झाला, त्यापैकी एकाचा जन्म 2023 मध्ये झाला आणि दुसऱ्याचा 2024 मध्ये. हॅम्डेन शहरात राहणारे मायकेल आणि आलिया कियोमी मॉरिस नुकतेच पालक झाले. आलियाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. दोघेही जुळे आहेत, परंतु त्यांचा जन्म काही मिनिटांच्या अंतराने झाला होता.

31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी जन्मलेली मुले

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सेव्हन मॉरिस असे नाव असलेल्या या मुलाचा जन्म 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11:59 वाजता झाला होता. त्याचे वजन सुमारे 3 किलो होते. तर त्याची जुळी बहीण सौली मॉरिस हिचा जन्म 3 मिनिटांनी म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12:02 वाजता झाला. तिचेही वजन तिच्या भावासारखेच आहे. अशा प्रकारे, येल येथे नवीन वर्षाच्या दिवशी जन्मलेली मुलगी अधिकृतपणे पहिले मूल आहे. दोन्ही मुलं तंदुरुस्त असून आईही बरी असून तिला विश्रांती देण्यात येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सीटी इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, येलच्या दुसऱ्या मुलाचा जन्म हार्टफोर्ड हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांचा जन्म सकाळी 12:06 वाजता झाला. त्यानंतर सेंट व्हिन्सेंट मेडिकल सेंटरमध्ये सकाळी 12:23 वाजता बाळाचा जन्म झाला. या घटनेची अमेरिकेत जोरदार चर्चा आहे.

Related posts