Pune Crime News Gangster Sharad Mohol Shot Dead In Kothrud Time To Annoy The Wife Swati On Her Wedding Birthday Pune Gang War

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सडकछाप गुंडांची राजकारणात आणि राजकीय व्यासपीठावर होणारी “पूजा” ही भारतीय राजकारणात नवीन नसली, तरी अलीकडील अट्टल गुंडांना सुद्धा तो मिळू लागला आहे. त्यामुळे पांढऱ्या कपड्यातील राजकारणात गुंड, बदमाशांचा सुद्धा अड्डा होऊन गेला आहे. पुण्यातील भरदिवसा गेम झालेला शरद मोहोळ त्याच पातळीवरील अट्टल गुन्हेगार आणि राजकारणात उजळमाथ्याने वावरणारा याच त्या चेहऱ्याचा आज (5 जानेवारी) शेवट झाला आहे. पुण्यातील सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कोथरुडमध्ये शरद मोहोळची दहशत आणि गुंडगिरी सुरु होती. त्याची पत्नी स्वातीने भाजपमध्ये माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत प्रवेश केला होता. 

पोलिसांसमोर शक्तीप्रदर्शन असो, कालीचरण महाराजांसोबतचा कार्यक्रम असो, कोथरुड परिसरात दहशत असो किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस असो सोशल मीडियावर हवा करणाऱ्या, कोथरुडमध्ये दहशत पसरवणाऱ्या हत्या, खंडणी, अपहरणाची सुपारी घेणाऱ्या शरद मोहोळचाच गेम खल्लास झाला आहे. ज्या कोथरुडमध्ये त्याची दहशत होती तिथंच भरदिवसा त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कोथरुडच्या सुतारदरा भागात शरद मोहोळवर गोळीबार झाला. मोहोळवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं. पुढे ससूनला हलवण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. 

योगायोगाची सुद्धा चर्चा 

भरदिवसा गँगस्टरवर झालेल्या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहेच, पण एका योगायोगाची सुद्धा चर्चा रंगली आहे. पुण्यातील जर्मन बेकरी ब्लास्टमधील आरोपी मिर्झा बेगला आजच जामीन मिळाला आहे आणि मोहोळची हत्या सुद्धा झाली आहे. शरद मोहोळसोबत जेलमध्ये मिर्झा बेगला राहिला होता. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. 

शरद मोहोळ होता तरी कोण पाहूया

शरद मोहोळच्या दहशतीने कोथरुड हादरत होतं. शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणाचे गुन्हे दाखल तसेच पिंटू मारणे हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. जामिनावर असताना दासवे गावचे सरपंच शंकर धिंडलेंचे अपहरण केले होते. सरपंचांच्या अपहरणप्रकरणी शरद मोहोळला पुन्हा अटक करण्यात आली. यानंतर खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन केल्याने सुद्धा अटक करण्यात आली होती.  इतकंच नाही, तर  जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते. 

लग्नाच्या बर्थडेला बायकोला ‘आक्रोश’ करण्याची वेळ

आणखी एक योगायोग म्हणजे शरद मोहोळच्या लग्नाचा आज (5 जानेवारी) वाढदिवस आहे. नेमक्या याचदिवशी मोहोळच्या आयुष्याची दोरी कापली गेली आहे.

पत्नीचा काही महिन्यांपूर्वी भाजप प्रवेश 

इतकंच नाही, तर ज्या कोथरूडमध्ये मोहोळनं दहशत माजवली, त्याच कोथरुडचे आमदार असलेल्या माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काहीच महिन्यांपूर्वी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांचा हिंदू आक्रोश मोर्चात अनेकदा सहभाग राहिला. कोथरूड भागात विविध उपक्रमांद्वारे संघटनाचा प्रयत्न केला होता. हळदी-कुंकू, मंगळागौरसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं होतं. भाजपने केलेल्या अनेक स्थानिक आंदोलनांमध्ये सहभाग होता. 

स्वाती मोहोळ यांच्या भाजप प्रवेशानंतर आता शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. मात्र, त्याआधीच त्याचा खेळ खल्लास झाला आहे. जे शस्त्र हाती धरून शरद मोहोळने दहशत माजवली, खंडणी उकळली, इतकंच काय तर जे शस्त्र वापरून मोहोळने अनेकांचा गळा घोटला तेच शस्त्र अखेरीस त्याच्या जिवावर बेतलं आहे. त्याच शस्त्राने शरद मोहोळच्या पापाचा घडा फुटून गेला आहे. याला नियतीचा खेळ म्हणायचं नाही, तर दुसरं काय? अशी स्थिती झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts