Fake ID in girls name pornographic videos and blackmailing Robbed of 25 crores;मुलीच्या नावाने आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fake ID blackmailing: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. एका टोळीने पाच हजार लोकांची 25 कोटी रुपयांची फसवणूक  केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक मुलीच्या नावाच्या आयडीद्वारे लोकांना स्वतःशी जोडायचे. त्यानंतर अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करायचे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ते लोकांना त्यांच्या खात्यात हव्या त्या रकमा ट्रान्सफर करून घेत असत. अटक करण्यात आलेल्या सायबर ठगांमध्ये तीन राजस्थानचे आणि दोन यूपीचे आहेत.

ठगांनी फेसबुकवर रिया शर्माच्या नावाने मुरादाबादच्या एका व्यावसायिकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. व्यावसायिकाने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याच्याकडून व्हॉट्सअॅप नंबर घेतला गेला. यानंतरअश्लील चॅटिंगही सुरु झाले. मुलीच्या नावाने चॅटिंग करत व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला गेला. यानंतर त्याला व्हिडीओ कॉल केला आणि अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. 

यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गुंडांनी व्यावसायिकाकडून 9.50 लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. याप्रकरणी मुरादाबाद सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसपी क्राइम सुभाषचंद्र गंगवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुंडांचा शोध सुरू केला. संबंधित फोन नंबर ट्रेस करताना पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती एसएसपींनी दिली. या गुंडांनी यूपी, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील पाच हजारांहून अधिक लोकांना फसवल्याची कबुली दिली. या टोळीत 40 हून अधिक जण सक्रीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजस्थानच्या दींग भरतपूर जिल्ह्यातील सिकरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेला गावचा रहिवासी लुकमान, अशफाक आणि अलवर जिल्ह्यातील चौपंकी येथील रहिवासी आफ्रिद, मथुरा जिल्ह्यातील कोसी पोलीस स्टेशन हद्दीतील नांगला सिरौली येथील रहिवासी नसीर यांचा समावेश आहे. आणि मोहम्मद, मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील सेओहरा येथील रहिवासी जोसेफ याचा समावेश आहे.

Related posts