Sharad Pawar Visit Satyashil Sherkar Junnar Sugar Factory Farmers Melava Atul Benke Ajit Pawar Maharashtra Politics Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गट आता वेगळा लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यातील राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी (Sharad Pawar) मला साथ दिली मी जुन्नर विधानसभा निवडणूक (Junnar Vidhansabha Election) लढवणार असं वक्तव्य काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) म्हणाले. त्यामुळे अद्याप आपली नेमकी भूमिका जाहीर न केलेल्या अतुल बेनके (Atul Benke)  यांना शरद पवारांनी राजकीदृष्ट्या घेरायला सुरूवात केल्याची चर्चा आहे. 

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके हे सध्या तरी तटस्थ आहेत. ते शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात वावरत असून ते नेमके कोणत्या गटात आहेत हे समोर आलं नाही. म्हणूनच की काय शरद पवारांनी त्यांच्यासमोर आता काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकरांच्या रूपाने पर्याय उभा केल्याची चर्चा आहे. मला पवारांनी ऑफर दिली तर मी नक्कीच जुन्नर विधानसभा लढवेल असं शेरकर म्हणाले. 

अतुल बेनकेंना पर्याय निर्माण करण्यासाठी पवारांची चाल

गेल्या तीन महिन्यात शरद पवारांनी सत्यशील शेरकरांच्या विघ्नहर साखर कारखान्याला दोन वेळा भेट दिली. सत्यशील शेरकर यांनी जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शेतकरी मेळाव्याला सत्यशील शेरकर हे पवारांच्या गाडीचे सारथी झाले होते, तेव्हा आमदार अतुल बेनके यांना मात्र गाडीत स्थान नव्हतं. यानिमित्ताने पवार शेरकरांना ताकद देत आहेत अशीच चर्चा मतदारसंघात रंगलेली आहे. 

कोण आहेत सत्यशील शेरकर? (Who Is Satyashil Sherkar)

सत्यशील शेरकर हे काँग्रेसचे दिवंगत नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपुत्र आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. जुन्नर तालुक्यातल्या युवा वर्गात त्यांची चांगली क्रेझ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळं शरद पवार जुन्नरमध्ये नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अतुल बेनकेंना पवारांचा योग्य तो संदेश 

जुन्नर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी आमदार अतुल बेनके हे निवडून आले आहेत. आपण कुणाच्याही गटात नाही, आपली निष्ठा फक्त पवार कुटुंबीयांसोबत आहे असं जरी अतुल बेनके म्हणत असले तरी त्यांची अजित पवारांशी जवळीकता सर्वश्रूत आहे. त्यामुळेच शरद पवार या ठिकाणी नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts