Sun Transit 2024 : मकर संक्रांतीला सूर्याचं शनिच्या राशीत संक्रमण! ‘या’ राशींना पुढील एक महिना संकटांचा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Surya Gochar 2024 : मकर संक्रांती 15 जानेवारीला सूर्य देव पुत्र शनिच्या घरात प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या राशीत सूर्याचं संक्रमण हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. खरं तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी या पुता पुत्रामध्ये शत्रूचं नातं आहे, असं म्हणतात. त्यामुळे अशा स्थितीत सूर्य गोचर हे काही राशींसाठी घातक ठरणार आहे. मकर संक्रांतीपासून पुढील एक महिना या राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Sun Transit or Surya Gochar to Saturn sign Capricorn on Makar Sankranti 2024 These zodiac signs will face troubles in the next one month)

मिथुन रास (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण फारसे अनुकूल नसणार आहे. पुढील एक महिन्यात तुम्हाला मोठं नुकसान होण्याची भीती आहे. व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळवण्यासाठी कठोर परीश्रम करावे लागणार आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला बजेटची काळजी घेणं गरजेचं आहे. या महिन्याभरात खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही गोष्टीवरुन वाद होण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी पुढील एक महिना कठीण असणार आहे. कामात अधिक लक्ष केंद्रित करा अन्यथा समस्यांना तोंड द्यावे लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं व्यवस्थापन आणि नियोजन लक्षपूर्वक करावं लागेल. जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर अहंकार-संबंधित वाद होण्याची भीती आहे. तुम्हाला पाय दुखणे आणि सांधे जडपणाची समस्या होण्याची शक्यता आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)   

सूर्य संक्रमणाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत अडचणी येणार आहेत. आर्थिक बाबतीत ना तुम्हाला नफा होईल ना तोटा. तुमच्यासाठी सूर्य गोचर सामान्य असेल पण कुटुंबात थोडे वाद विवाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला तणाव आणि असुरक्षिततेची भावना जाणवणार आहे. घरात तुम्हाला कोणच्या तरी आरोग्यासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

या राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणात अस्वस्थ वाटणार आहे. तुम्हाला जीवनात सुखसोयीसाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्याशिवाय तुमच्या इच्छा दडपून टाकाव्या लागणार आहेत. तुम्हाला काही नवीन सौदे देखील मिळू शकतात मात्र तुम्हाला सर्व कामं अत्यंत काळजीपूर्वक करावे लागणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर संकट घेऊन येणार आहे. एखाद्या गोष्टीबद्दल असुरक्षिततेची भावना तुम्हाला जाणवणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रगतीतही अडथळे येणार आहेत. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना व्यवसायात अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अनुकूल संबंध राखण्यात अपयशी ठरणार आहात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts