IndiGo flight Pilot Beaten By Passenger Due to Delay 13 Hours Between Delhi to goa watch Video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Flight Delay : प्रवास करताना उशिर झाला तर अनेकांची चिडचिड होते, तर अनेकांचा संयम देखील सुटतो. मग सुरू होतो राडा… अशातच आता दिल्लीमधून (Delhi Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या एका फ्लाईटमधील प्रवाशाने पायलटसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने पायलटच्या थेट कानशिलात (IndiGo flight Pilot Beaten By Passenger) लगावली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

झालं असं की, दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. एका प्रवाशाला संताप झाल्याचं दिसून आलं. पायलट फ्लाईटला उशिर का झाला? याबाबत माहिती देत असताना एक पिवळ्या रंगाची हुडी घातलेला व्यक्ती धावत पायलटच्या जवळ आला अन् त्याच्या नाकावर थेट बुक्की दिली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केलाय. पायलटला त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होता, की तुम्ही असं करू शकत नाही. मात्र, त्यावेळी मी का नाही करू शकत? इतका उशिर करतात का? असा सवाल रागात प्रवाशी विचारत होता. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला रोखलं अन् भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

पाहा Video

फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे अनेक तासांच्या विलंबानंतर या वैमानिकाने मागील क्रूची जागा घेतली होती. इंडिगोने प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर लगेचच प्रवाशाला विमानातून बाहेर काढून अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइटचे सह-वैमानिक अनुप कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम 323, 341, 290 आणि 22 विमान नियमांनुसार एफआयआर नोंदवला आहे.

दरम्यान, वादळ असो, दाट धुकं असो किंवा कोणतीही तांत्रिक बिघाड असो, विमान प्रवासावर नक्कीच परिणाम होतो. डिसेंबर-जानेवारी महिन्यात उत्तर भारतात अनेकदा प्रवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकजण विमानाने प्रवास करत नाहीत. त्याऐवजी रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची प्राथमिकता असते. त्यामुळे प्रवास करताना मुड खराब होऊ नये म्हणून वेळ आणि परिस्थिती याचं नियोजन करणं नेहमी गरजेचं असतं. 

Related posts