Sion Over bridge: सायन पूल आजपासून बंद! बेस्ट बसच्या 13 मार्गांमध्ये मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sion Over Bridge​ : तब्बल 110 वर्षे जुना सायन ओव्हर ब्रिज आजपासून बंद करण्यात येणार आहे. सायनचा हा महत्त्वाचा पूल पाडण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात येणार आहे. यामुळे पाडकामामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने गाड्यांच्या 13 मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. 

मध्य रेल्वेने 20 जानेवारीपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स तसेच एलबीएस रोडला जोडणारा सायन ओव्हरब्रिज पाडण्याची तयारी केल्याने, या भागातील वाहतूक वळवण्यात येणार आहे. संत रोहिदास मार्ग आणि कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरून सायनच्या दिशेने आणि सायन जंक्शनपासून कुर्ला आणि वांद्रेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीला पुढील पाच महिने याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

सायन पूल पूर्व आणि पश्चिम भागाला जोडत असल्याने वाहतुकीसाठी तो महत्त्वाचा मार्ग आहे. मध्य रेल्वे हा पूल तोडून नव्याने बांधणार आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन एलबीएस रोड, संत रोहिदास मार्गावरील वाहतूक तसेच एलबीएस रोड, संत रोहिदास मार्गावरुन बाबासाहेब आंबेडकर मार्गावर जाणारी वाहतूक आजपासून 18 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनानेही आपल्या बसच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने शुक्रवारी जाहीर केले होते की, 20 जानेवारीपासून सायन ब्रिज बंद पडल्यानंतर 24 मार्गांवर लक्षणीय परिणाम होईल. या मार्गावरुन बेस्टच्या दररोज 200 हून अधिक बसची वाहतूक होते. ब्रिज पाडण्यात येणार असल्याने बेस्ट अनेक मार्गात बदल करुन काही फेऱ्या बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

बेस्टचे प्रवक्ते सुनील वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदल झालेल्या मार्गांमध्ये सुलोचना, 60 फूट रोड आणि धारावी टी-जंक्शन मार्ग मार्गांचा समावेश असेल. तसेच 56 बसेससह एकूण 7 मार्गांवर परिणाम होईल. याव्यतिरिक्त, 26 बससह 4 मार्ग महाराष्ट्र वजन काटा आणि सायन हॉस्पिटल दरम्यान वळवतील. याशिवाय, 32 बसेसचा समावेश असलेले 4 मार्ग कमी केले जातील आणि 26 बसेस असलेल्या 3 मार्गांमध्ये पूल बंद झाल्यामुळे त्यांच्या स्टॉपमध्ये बदल होईल.

‘या’ मार्गांमध्ये बदल

11 मर्यादित हि बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल मार्गे नेव्ही नगर येथे जाईल .

181 , 255म .348 म . 355 म या बस कला नगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल सायन सर्कल मार्गे जातील.

बस क्र ए 376 हि सायन सर्कल हुन सायन हॉस्पिटल सुलोचना शेट्टी मार्गाने बावरी कॅम्प मार्गे माहीम येथे जाईल.

सी 305 बस धारावी आगार हुन पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल हुन बॅकबे आगार येथे जाईल .

बस क्र 356 म , ए 375 , व सी 505 या बस कला नगर बी के सी हुन प्रियदर्शनी येथे जातील.

बस क्र 7 म , 22 म , 25 म व 411 या बस महाराष्ट्र काटा , धारावी आगार हुन पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल मार्गे जातील.

बस क्र 312 व ए 341 या बस महाराष्ट्र काटा , धारावी आगार हुन पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कल मार्गे जातील.

बस क्र ए सी 72 भायंदर स्थानक ते काळाकिल्ला आगार व सी 302 हि बस मुलुंड बस स्थानक ते काळाकिल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.

बस क्र 176 व 463 या बस काळाकिल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक 90 फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.

बस क्र ए सी 10 जलद , ए 25 व 352 या बसगाड्या राणी लक्ष्मीबाई चौक येथे खंडित करण्यात येथील व तेथूनच सुटतील.

Related posts