there will be a conjunction of Venus and Jupiter the golden time of these zodiac signs will begin there will be success in every field

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Guru And Shukra Conjunction 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुक्र हा धन, ऐश्वर्य, विलास, वैभव आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. गुरु ग्रह समृद्धी, ज्ञान, गुरु आणि अध्यात्माचा कारक आहे. येत्या एप्रिल महिन्यात या दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे.

तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीमध्ये गुरु आणि शुक्राचा संयोग होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी असणार आहेत.

तूळ रास (Tula Zodiac)

शुक्र आणि गुरूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. गुरू आणि शुक्राचा संयोग तुमच्या राशीतून सातव्या घरात होणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्ही भागीदारी व्यवसाय केला तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तुमचा बँक बॅलन्स वाढवून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. 

मेष रास (Aries Zodiac)

शुक्र आणि गुरूची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. सामाजिक क्षेत्रात प्रभाव आणि प्रतिष्ठेचा लाभही तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत अधिका-यांकडून प्रोत्साहन आणि लाभ मिळू शकतात. नीट विचार करून योग्य निर्णय घेऊ शकाल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच यावेळी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

मीन रास (Aries Zodiac)

गुरू आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. ज्याच्या मदतीने लोक तुमच्याशी जोडले जातील. या काळात तुम्ही वाहन इत्यादी खरेदी करू शकता. तसेच यावेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts