Manoj Jarange Patil Maratha Reservation activist warn Chhagan Bhujbal and OBC organization on Challenge to Maratha Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange :  आरक्षणाच्या मुद्यावर आता मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी संघटनांमधील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठा मोर्चानंतर राज्य सरकारने आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनानंतर ओबीसी संघटना नाराज झाल्या असून राज्यात जनजागृती यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे  आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज कराव लागेल आणि आरक्षण रद्द झाल्यास आम्ही जबाबदार नसणार असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. अहमदनगरमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी ओबीसी संघटनांवर चीका केली. 

ओबीसी समाजाकडून लवकरच राज्यभर यात्रा काढली जाणार असल्याचा निर्णय नाशिक येथे झालेल्या बैठकीत झाला आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी ओबीसी संघटनांनी यात्रा काढाव्या नाही तर जत्रात जाऊन खात बसावं, आम्हाला देणं-घेणं नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडल आहे. 

आरक्षण गेल्यास आम्ही जबाबदार नाही 

मनोज जरांगे यांनी म्हटले की, ओबीसी बांधवांनी त्याला (छगन भुजबळ यांना) समजून सांगावं. त्याच्या एकट्यामुळे ओबीसींचं वाटोळं होणार आहे. जर त्यांनी आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज कराव लागेल. आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यास ओबीसींचे पूर्णच्या पूर्ण 27 टक्के आरक्षण रद्द होऊ शकते असा इशाराच जरांगे यांनी दिला. 

ओबीसी मेळाव्यावर टीका 

3 फेब्रुवारीला अहमदनगर येथे ओबीसीचा महाएल्गार मेळावा होणार आहे. यावर मनोज रंगे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कोणी कार्यक्रम घ्यावा किंवा नाही घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र ते येवल्याचं जे इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत. त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला म्हणजे आम्ही घ्यायचा असं आम्ही करत नाही. उलट आमच्यामुळे झालेल्या कायद्यामुळे त्यांच्यातल्या ओबीसींना देखील फायदा होणार आहे. आमची नियत साफ आहे म्हणून नाहीतर आम्ही देखील म्हणू शकलो असतो की कायदा आमच्यामुळे झालाय त्यांच्यातल्या ओबीसींना उडवा हा कायदा केवळ आमच्यासाठी आहे. पण आमची नियत साफ आहे. त्यामुळे त्याच्या सोबत जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना देखील माझं सांगणं आहे की तुम्ही त्याच्या नादी लागू नका असे म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts