Google Pay चा वापर आता डेबिट कार्डशिवाय आधार कार्ड नंबरने, पाहा सोप्या स्टेप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Pay with Aadhar Card : नोटबंदीनंतर ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य मिळाले आहे. सध्या सर्वत्र डिजीटल पेमेंटला प्राधान्य देण्यात येत आहे. सध्याच्या या डिजीटल जगात आपण सर्वचजण ऑनलाइन UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. GPay चा वापर वाढला आहे. छोट्या दुकानदारासह मॉलमध्ये आपण UPI पेमेंट करतो. आता Google Pay चा वापर करताना तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही. आधार कार्ड नंबरनेही Google Pay वापरता येणार आहे.

विविध प्रकारचे UPI पेमेंट सध्या उपलब्ध असून ​त्यात एक जुने आणि व्हेरिफायड ॲप म्हणजे गूगल पे. दरम्यान गूगल पे सुरु करताना UPI पेमेंट सेट करण्यासाठी डेबिट कार्ड तपशील आवश्यक असतो. परंतु आता Google ने नवीन अपडेट आणले आहे. यामुळे यूजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तुम्ही तुमच्या आधार क्रमांकासह Google Pay अ‍ॅक्सेस करु शकता आणि UPI पेमेंट वापरु शकता. 

Google India ने UIDAI सोबत आधार क्रमांकावर आधारित UPI पेमेंटसाठी भागिदारी केली आहे. त्यामुळे सध्या कोणतेही UPI पेमेंट अ‍ॅप अशी सुविधा देत नाही. कोणत्याही UPI पेमेंट अ‍ॅपसाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिन आवश्यक आहे, परंतु Google Pay वापरताना तुम्ही आता फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने ऑथिंटिकेशन करु शकता. 

दरम्यान, Google Pay वापरण्यासाठी, तुमचा मोबाइल क्रमांक आधार क्रमांकासह  बँक खात्याशी लिंक असला पाहिजे आणि मोबाइल क्रमांकही हा आधार कार्डशी देखील लिंक हवा. Google Pay ची ही सुविधा सध्या फक्त काही बँकांसाठी उपलब्ध आहे. परंतु लवकरच ती सर्व बँकांसाठी जारी केली जाईल.

असा करा वापर करु शकता?

तुम्हाला आधार कार्डने गूगल पे वापरायचे असेल तर प्रथम Play Store किंवा Apple च्या App Store वरुन Google Pay अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. तेथे तुम्हाला डेबिट कार्ड व्यतिरिक्त आधार क्रमांकाचा पर्याय दिसेल. आता आधार कार्डच्या पर्यायावर क्लिक करा आणि OTP टाकून नेक्स करा.

एकदा तुम्ही OTP टाकला की त्यानंतर, तुम्हाला एक पिन विचारला जाईल जो Google Pay अ‍ॅपसाठी असेल म्हणजेच तुम्ही जेव्हाही Google Pay द्वारे पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला हा सहा अंकी पिन आवश्यक असेल. 

एकदा तुम्ही तुमचा यूनिक पिन सेट केला की  तुमचा आधार क्रमांक ज्या देखील बँक खात्याशी लिंक आहे ते बँक खाते Google Pay वर दिसेल. मग तुम्हाला बँक खाते सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही गूगल पे सेवा वापरु शकता.

Related posts