काश्मिर पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मिर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला! -फारुख अब्दुल्ला यांचे विधान

(pragatbharat.com): श्रीनगर- जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्याचा संबंध थेट द काश्मिर फाइल्स या चित्रपटाशी जोडला आहे. काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे सतीलतर सरकारने द काश्मिर फाईल्स या चित्रपटावर बंदी घालावी, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर नायब राज्यपालांच्या आदेशानुसार खोर्‍यातील काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. काल लष्कर ए इस्लामनेही धमकी दिली होती. तुमचा बचाव दुप्पटतिप्पट करा. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर टार्गेट किलींगसाठी तयार रहावे. यावर पत्रकारांशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, सध्या देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच काश्मिरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संताप पसरत आहे. मी सरकारला विचारले की, काश्मिर फाईल्स चित्रपट खरा आहे का? मुसलमान आधी हिंदूला मारेल, मग त्याचे रक्त तांदळात टाकून त्याच्याच बायकोला खाया सांगेल. हे होऊ शकते का? आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का? काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील तर सरकारने द काश्मिर फाईल्स या चित्रपटावर बंदी घालावी.

Related posts