narendra modi 56 inch thali for birthday, 72 वर्षांचे नरेंद्र मोदी 24 तास काम करण्याइतके फिट कसे? या 5 गोष्टी त्यांच्या एनर्जीला धक्काही लागू देत नाहीत.. – on the occasion of 71st birthday of indian prime minister narendra modi know his secrets of fitness energy and complete diet plan( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (India’s PM narendra Modi Fitness Secret) यांची गणना जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पंतप्रधानांमध्ये केली जाते. आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस (PM Modi Birthday) आहे. 18 तास काम करून आणि देशाच्या विविध गंभीर समस्यांवर काम करण्यात व्यस्त असूनही ते स्वतःला अॅक्टिव्ह आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय करतात हे जाणून घेऊया. अनेकदा स्वत: पंतप्रधान मोदींनी लोकांशी बोलताना त्यांचा दिनक्रम (Daily Lifestyle), फिटनेस मंत्र शेअर केला आहे. पण आज आम्‍ही तुम्‍हाला त्‍याच्‍या डाएटमध्‍ये समाविष्ट असलेल्‍या पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे एनर्जी टॉनिकपेक्षा कमी नाहीत.

जवळपास सर्वांनाच माहीत आहे की, पंतप्रधान मोदींची गणना अशा राजकारण्यांमध्ये केली जाते जे अत्यंत सामान्य जीवन जगतात. त्यामुळे जर तुम्ही मोदींच्या आहारात काही फार विचित्र किंवा महागडे पदार्थ असण्याची अपेक्षा करत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. स्वत:ला निरोगी आणि उत्साही ठेवण्यासाठी पीएम मोदी अतिशय साधं डाएट फॉलो करतात. यासोबतच पीएम मोदी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आणि उपवासही करतात.

शेवग्याच्या पालेभाजीचे पराठे (Drumstick Paratha)

फिट इंडिया मुव्हमेंट दरम्यान बोलताना पीएम मोदी म्हणाले होते की, ते आठवड्यातून एक किंवा दोनदा ड्रमस्टिक पराठा अर्थात शेवग्याच्या भाजीपासून बनलेला टेस्टी पराठा खातात. आयुर्वेदात 300 रोगांवर औषध म्हणून शेवग्याच्या भाजीचा वापर केला जातो. शेवग्याच्या पान, बिया यापासून संंपूर्ण शेंगेंपर्यंत सर्व भागांमध्ये औषधी गुणधर्म असतात. पबमेडच्या (Pubmed) मते, याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅल्शिअम भरपूर असल्याने सायटिका, सांधेदुखीमध्ये शेवगा खूपच फायदेशीर ठरतो. पचायला हलकी असल्याने शेवग्याची भाजी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. यासोबतच पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता अशा पोटाशी संबंधित समस्यांमध्येही हे अमृतासम आहे.

(वाचा :- पोट साफ न होणं, मुळव्याध, शौचाच्या जागेची जखम, बद्धकोष्ठतेसाठी अमृत आहे डॉक्टरांचे हे 5 उपाय, झटक्यात व्हाल बरे)

आठवड्यातून 3 वेळा खिचडी

-3-

देशाच्या पंतप्रधानांच्या फिटनेसचे रहस्य कोणतेही महागडे अन्नपदार्थ नसून गुजराती स्टाइलमध्ये बनवली जाणारी दाल खिचडी आहे. ही खिचडी काठियावाडी वाघारेली खिचडी म्हणूनही ओळखली जाते. ही खिचडी मसालेदार असते पण पंतप्रधान मोदींना कमी मसाल्यात बनवलेली खिचडी खायला आवडते. तांदूळ आणि मूग डाळीत पाणी, हळद आणि मीठ घालून शिजवले जाते. नंतर त्यात मोहरी, जिरे, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि धणे पावडर घालून तडका दिला जातो. पंतप्रधान मोदी आठवड्यातून किमान तीन दिवस वाघारेली खिचडी खातात. खिचडी पचण्याजोगी आणि ब जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फॉस्फरस, फॉलिक अॅसिड, मॅंगनीज आणि सर्व आवश्यक अमीनो अॅसिड्सने समृद्ध असते. हळदीसारख्या मसाल्यांनी बनवलेली खिचडी सूजन-विरोधी फायदे देते. याशिवाय ही खिचडी श्वसनाशी संबंधित समस्या, ऍलर्जी, संधिवात, हाडांच्या समस्या, मधुमेहाच्या जखमा भरण्यासाठी इत्यादींवरही फायदेशीर आहे.

(वाचा :- Liver Cancer : तुमची ही एक चूक वाढवते तब्बल 75 टक्क्यांनी लिव्हर कॅन्सरचा धोका, करा हे उपाय, नाहीतर जीव धोक्यात)

हळदीचे नियमित सेवन

पीएम मोदी नियमितपणे हळदीचे सेवन करतात. फिट इंडिया मुव्हमेंटला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल फिटनेस आणि आरोग्याविषयी बोलताना मोदी म्हणाले की, त्यांची आई त्यांना नेहमी विचारते की तू रोज हळद खातो की नाही. वास्तविक, आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधांमध्ये हळद गणली जाते. NCBI एनसीबीआयच्या मते, त्यात अँटी-इन्फ्लामेट्रा, अँटिऑक्सिडंट, अँटीट्यूमर, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, कार्डिओप्रोटेक्टिव्ह (हृदयास हेल्दी ठेवणारे गुणधर्म), हेपेटोप्रोटेक्टिव्ह (लिव्हर हेल्दी ठेवणारे गुणधर्म) आणि नेफ्रोप्रोटेक्टिव्ह (किडनी हेल्दी ठेवणारे गुणधर्म) असतात.

(वाचा :- चुकूनही करू नका ‘या’ 9 संकेत व लक्षणांकडे दुर्लक्ष, एक नाही तर संपूर्ण 5 प्रकारच्या कॅन्सरची असू शकते सुरूवात.!)

रोज एक वाटी दही

पंतप्रधान मोदी रोज एक वाटी दही खातात. दही पचनासाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही दररोज एक वाटी दह्याचे सेवन केले तर तुम्ही अनहेल्दी वजन वाढ, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, कमकुवत दात व हाडे आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार यासारख्या समस्या टाळू शकता. याचे कारण म्हणजे दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन बी-2, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात.

(वाचा :- Fatty Liver Disease : झोपण्याशी संबंधित ही सवय वाढवते लिव्हर सडण्याचा धोका, ताबडतोब बदला नाहीतर होईल लिव्हर फेल)

मशरूम

पीएम मोदींनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ते हिमाचलमध्ये पिकवलेले माउंटन म्हणजेच डोंगरातील मशरूम खातात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याला मोरेल मशरूम म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. यासह, हे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, हृदयरोगांपासून संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते.

(वाचा :- High BP side effects : एक पॉइंटही वाढला ब्लड प्रेशर तर वितळतील पूर्ण शरीरातील हाडे, स्टडीमध्ये धक्कादायक खुलासा)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Related posts