Hyderabad Liberation Day Marathwada Ambadas Danve On Aurangabad University Program( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ambadas Danve News: शिवसेना शिंदे गटातील वाद काही थांबता थांबत नाही. त्यातच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr Babasaheb Ambedkar Marathwada Vidyapeeth) छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांचे नाव डावलण्यात आल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर कालच्या कार्यक्रमात डावलल्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विद्यापीठ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत अंबादास दानवे यांचे नाव डावलण्यात आले होते. त्यामुळे दानवे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर आज दानवे यांनी विद्यापीठ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन केलं.

कुलगुरूंच्या विरोधात हक्कभंग 

विद्यापीठ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात दानवे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे, त्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे. तर शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची नाव टाकायला हवी हा शिष्टाचाराचा भाग आहे. मात्र कुलगुरूंना याचा विसर पडला असावा, त्यामुळे कुलगुरूंकडून अशा राजकारणाची अपेक्षा नव्हती असं म्हणत दानवेंनी नाराजी व्यक्त केली आहे.यावरच एबीपी माझाने कुलगुरूंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणत बोलण्यास टाळळ आहे. 

खैरेंचीही नाराजी 

तर या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सरकारकडून प्रत्येक वेळेस अशा प्रकारेच शिवसैनिकांना डावलण्यात येते. त्यामुळे अंबादास दानवे यांनी हक्कभंगाची घेतलेली भूमिका योग्य असल्याचं खैरे म्हणाले आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झाले. या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री  प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, नारायण कुचे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ,  कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव देण्यात आलं नव्हतं.

इतर महत्वाच्या बातम्या

Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्रामात ‘तांदुळजा गढी’चे महत्त्व, याच गढीवर उद्या होणार ध्वजारोहण

Related posts