1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होऊ शकतो. आज सादर झालेल्या बजेटव्यतिरिक्त आज 1 फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत. तर, आजपासूनच ते लागू होणार आहेत. काय आहे आहेत हे नियम आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया. 

प्रत्येक महिन्यानुसार फेब्रुवारी महिन्याही अनेक नियमांत बदल झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे. कोणते आहेत हे नवे नियम, ज्यामुळं तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच NPS विड्रॉल, ऑनलाइन ट्रान्सेक्शननिगडीत नियम लागू होणार आहेत. 

1) FASTag KYC नियमांत बदल 

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने विनाकेवायसी असलेल्या फास्टॅगला बॅकलिस्ट किंवा डिअॅक्टिव्हेट करण्याची घोषणा केली आहे. फास्टॅगमध्ये बॅलेन्स असूनदेखील बंद करण्यात येईल. एनएचआयने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची डेडलाइन एका महिन्यांनी वाढवली आहे. जर तुम्ही केवायसी अपडेट केलं नाही तर 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. One Vehicle One FASTag याअंतर्गंत हे पाऊल उचलले आहे. 

2) IMPS नियमांत मोठा बदल

जर तुम्ही ऑनलाइन ट्रान्जेक्शन करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. RBIच्या नियमांनुसार, आता IMPSच्या माध्यमातून बेनिफेशरीचे नाव न जोडताही बँक अकाउंटमधून 5 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करु शकणार आहात. NPCIने 31 ऑक्टोबरपर्यंत एक सर्कुलर जारी करुन ही माहिती दिली होती. त्यात म्हटलं होतं की,  IMPS संबंधित नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. 

3) NPS विड्रोलच्या नवीन नियम लागू होणार 

पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने 12 जानेवारी 2024 रोजी एक सर्कुलर काढून जारी केले आहे की नॅशनल पेंशन सिस्टम (National Pension System) संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात येत हे. याअंतर्गंत सब्सक्रायबर्ससाठी विड्रोलचे नवे नियम (NPS Withdrawal Rules) लागू केले जाणार आहेत.1 फेब्रुवारीपासून एनपीएस अकाउंटहोल्डर्सला एम्पलॉयर कॉन्ट्रीब्यूशनसोडून एकूण रकमेतून फक्त 25 टक्के रक्कम काढण्याची परवानगी असेल. यासाठी अकाउंटहोल्डर्सना सेल्फ डिक्लेरेशनसह विड्रॉल रिक्स्वेस्ट सबमिट करावी लागणार आहे. यानंतर व्हेरिफिकेशन केल्यानंतरच रक्कम काढता येणार आहे. 

4) एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये वाढ

अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर 14 रुपयांनी वाढला आहे. 1 फेब्रुवारी 2024पासून हा नवीन नियम लागू केला जाणार आहे. सिलेंडरच्या किंमती वाढल्याने आता दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 1769.50 रुपये झाला आहे. मुंबईत, 19 किलोचा सिलेंडर आता 1723 रुपयांनी वाढला आहे. 

5) SGBचा नवीन हप्ता

रिझर्व्ह ऑफ इंडिया 2023-24 या आर्थिक वर्षातील सॉव्हरिन गोल्ड बाँडचा शेवटचा हप्ता फेब्रुवारीपर्यंत जारी करणार आहे. 

6) SBI होम लोन

स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे विशेष गृहकर्ज योजना राबवली जात आहे. बँकेचे ग्राहक गृहकर्जावर 65 bpsपर्यंत सूट घेऊ शकतात. प्रक्रिया शुल्क आणि गृहकर्जावर सवलत देण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे. 

Related posts