Make Marathwada drought free deputy-chief-minister-devendra-fadnavis-announced in marathwada-mukti-sangram day program in nanded( प्रगत भारत । pragatbharat.com)

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त नांदेडमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये ध्वजारोहण करत शहिदांना मानवंदना दिली. यावेळी मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढून मराठवाड्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ, मराठवाड्याला लवकरच दुष्काळमुक्त करु, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

हेही वाचा- “विरोधकांना घोषणाबाजीशिवाय दुसरे काम नाही”, हैदराबादेतील कार्यक्रमाच्या उपस्थितीवरुन शिंदेंचा टोला; वेदान्त प्रकल्पावरुन केला ‘हा’ आरोप

विकासात मराठवाड्याला प्रथम क्रमाकांवर नेणार

मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा स्वातंत्र्यवीरांना सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, याचा कधीही स्वैराचारात परिवर्तन होता कामा नये. आपण आता जी नवराष्ट्राची निर्मिती करतोय, त्यामध्ये मराठवाडा मागे राहणार नाही. विकासाच्या बाबतीत मराठवाड्याला प्रथम क्रमांकावर किंवा महाराष्ट्रासोबत नेण्याचा प्रयत्न करु. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरुन काढू अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची मदत

मराठवाड्यातील कित्येक मंडळात यंदा ६ ते ६ वेळेस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने साडे सातशे कोटी रुपये दिले आहेत. ३ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. नागपूर-मुंबई एक्सप्रेस वेमुळे मराठवाड्यातही इकॉनॉमिक कॉरिडोअर निर्माण होणार आहे.

हेही वाचा- “दिल्लीच्या पातशहांसाठीच…”,मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमावरून शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड!

मराठवाडा लवकरच दुष्काळ मुक्त होईल

नांदेड ते जालना हा मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. या मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याकरिता निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यामुळे नांदेड मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. उद्योजक तसेच नागरिकांनाही याचा फायदा होईल. गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी आणण्यासाठी मराठवाडा ग्रीड प्रकल्प राबवला जाईल. या प्रक्लपाबाबत काही लोकांचे गैरसमज आहेत, ते दूर करण्यात येतील. यामुळे मराठवाडा लवकरच दुष्काळ मुक्त होईल. मराठवाड्याचा शेतकरी सुजलाम, सुफलाम करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करु, असेही फडणवीस म्हणाले.Related posts