Abdul Sattar News 27 Lakh Farmers Affected By Heavy Rains In The State This Year, Assistance Of Rs 3 Thousand 500 Crore Deposited In Farmers Accounts Says Agriculture Minister Abdul Sattar ( प्रगत भारत । pragatbharat.com)

Abdul Sattar : मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीत खडखडाट होता, हे अजित दादांना देखील माहित असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं. या सरकारमध्ये जर तिजोरीचा खडखडाट असता तर 3 हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले नसते असेही सत्तार म्हणाले. खडखडाट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे सत्तार म्हणाले. दरम्यान, राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले आहेत. त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदत पोहोचली असल्याचेही सत्तार म्हणाले.

गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 97 कोटी रुपयांची मदत

दरम्यान, ऑनलाईन ई-पीक पाहणीत बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असल्याचे सत्तार म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली आहे. सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन सोडले आहेत. राज्यात 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असल्याचे सत्तार म्हणाले. मराठवाड्यात गोगलगायीमुळं सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील 97 कोटी रुपयांची मदत आपण जाहीर केल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे.

लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मोठं नुकसान

खरीप हंगामात सोयाबीनचे पीक ऐन जोमात आल्यानंतर अनेक ठिकाणी शंखी गोगलगायीनी ते नष्ट केले होते. परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे याची नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे निर्देश दिले होते. यानुसार या 3 जिल्ह्यांना 98 कोटी 58 लाख रुपये निधी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीत प्रगती केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा प्रचार, प्रसार करावा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांसाठी या यशोगाथा पथदर्शी ठरतील. कृषी योजनांची माहिती कृषी यंत्रणेमार्फत गावातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. गावातील शेतकरी सुखी व्हावा, शासकीय योजनांचा लाभ थेट गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न असल्याचे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Related posts