Ncp Leader Ajit Pawar Criticism On Govt Over Foxconn Vedanta Project ( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : केंद्रात तुमच्या विचारांचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यात तुमचे सरकार आहे. आणखी किती राज्यात तुम्हाला सरकार पाहिजे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला केला. सगळंच तुम्हाला पाहिजे का? भारतीय लोकशाही वेगळ्या प्रकारची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात बहुमताचा आदर करा असे सांगितले आहे. त्यांनी फोडाफोडीचा आदर करा असे सांगितले नाही. गद्दारी करा, खोक्याचं राजकारण करा असं सांगितलं नाही असे म्हणत अजित पवारांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सत्तेची नशा उतरवण्याची ताकद या जनतेमध्ये असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील तरुणांनी आता पेटून उठलं पाहिजे

कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशमध्ये भाजपनं सरकार पाडलं. आता गोव्यात काँग्रेसचे आमदार फोडले. अरे कुठे ठेवता त्यांना, सगळेच तुम्हाला पाहिजे का?  असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला. बीडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रातील तरुणांनी आता पेटून उठलं पाहिजे. यांच्या नाकर्तेपणामुळं दीड ते दोन लाख युवक आणि युवतींच्या नोकरीवर गंडातर आलं असल्याचे ते म्हणाले. आमचं सरकार असताना शेतकऱ्यांना आम्ही शून्य टक्के व्याज दरानं पैसे देण्याचा निर्य घेतला होता. आता तो निर्णय बदलला आहे. का उत्तर देत नाहीत. आमच्या सरकारनं प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार म्हणाले. आमचं सरकार कोणी घालवलं ते देशाच्या जनतेसमोर आलं आहे. कोण यामागे काम करत होते. कोण वेगवेगळ्या पद्धतीनं ड्रेस बदलून काम करत होते हे सर्वांना माहित झाल्याचे अजित पवार म्हणाले. 

 सत्तेची नशा उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या जनतेत

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्यावरुन देखील अजित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणतायेत दुसरा प्रकल्प आणतो. पण ते काय तुमच्या घरचं आहे काय? असा टोला अजित पवारांनी लगावला. वेळ मारुन नेण्याची यांची पद्धत असल्याचे अजित पवार म्हणाले. देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पण त्यांच्यावर कोणी बोलायला तयार नसल्याचे अजित पवार म्हणाले. तुमच्या सत्तेची नशा उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे, हे सरकारनं लक्षात ठेवावं असे देखील अजित पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत

ढगफुटीमुळं, अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. अजूही हवामान विभाग म्हणत आहे की पुन्हा पाऊस पडेल. जायकवाडी धरण उजनी धरण पुन्हा एकदा भरलं असतं एवढ पाणी वाहून गेल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत आले आहे. त्या शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत. यासाठी मोर्चे आंदोलने काढावे लागत आहेत. एखादा मुलगा ज्यावेळी तुम्हाला नोकरी मागायला येतो त्यावेळी तुम्ही लाठीहल्ला करता काय? सत्ता यासाठी घेतली काय? असा खडा सवालही अजित पवारांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या:

Related posts