Happy Birtday R Ashwin BCCI Chennai Super Kings CSK ( प्रगत भारत । pragatbharat.com)

Happy Birtday R Ashwin: भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनसाठी आजचा दिवस खूप खास आहे. 17 सप्टेंबर 1986 मध्ये जन्मलेल्या अश्विनचा आज वाढदिवस आहे. तो आज 36 वर्षांचा झालाय. दरम्यान, अश्विनची सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये गणना केली जात असून भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात त्यानं मोलाचं योगदान दिलंय. अश्विनच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) खास ट्विट केलंय. ज्यात अश्विनची यशस्वी कारकिर्द दर्शवणारे आकडे पोस्ट करण्यात आले आहेत. तर, आयपीएलच्या गेल्या अनेक हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाचं (Chennai Super Kings) प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनसाठी सीएसकेनंही त्याचा खास फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 442 विकेट्सची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह पहिल्या स्थानावर आहे. इतकंच नव्हेतर, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ जिंकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीतही अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. सलामीवीर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आर अश्विननं अप्रतिम गोलंदाजी करत जगावर छाप सोडलीय. 

बीसीसीआयचं ट्वीट-

चेन्नई सुपरकिंग्जचं ट्वीट- 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनची कामगिरी
अश्विननं 79 कसोटी, 111 एकदिवसीय आणि 46 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 413, 150 आणि 52 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विननं पाच शतकासह एकूण 2 हजार 685 धावा केल्या आहेत.

भारताच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका
भारताच्या स्टार ऑलराऊंडरच्या यादीत अश्विनचा समावेश आहे. त्यानं गोलंदाजीच नाही तर फलंदाजीनीही उत्तम प्रदर्शन करून दाखवलंय. कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या अश्विननं अनेक सामन्यात खालच्या फळीत फलंदाजी करत भारताला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय. अश्विन हा सुरुवातीच्या काळात कॅरम बॉलसाठी प्रसिद्ध होता. त्यानं 2019 मध्ये श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

हे देखील वाचा- 

Related posts